आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती आहे. त्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरात शिवभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले आहे. अबू आझमींच्या वक्तव्यानंतर औरंगजेबाची कबर काढून टाका या मागणीसाठी आता विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलही आक्रमक झाला आहे. औरंगजेबाची कबर शासनाने लवकरात लवकर हटवावी यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल राज्यवापी आंदोलन करणार आहे.
पोलिस अधिकारी निकेतन कदम यांच्यावर दंगेखोरांचा कुऱ्हाडीने हल्ला
नागपूर झोन 5 चे डीसीपी निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. दंगलखोरांकडून कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांचे शांततेचे आवाहन
नागपूर येथील महाल भागात दगडफेकीच्या दुर्दैवी घटनेतून तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची पुरेपूर दक्षता पोलीस प्रशासन घेत आहे. माझे सर्व नागपूरकरांना नम्र आवाहन आहे की, कृपया आपण सर्वांनी देखील प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. नागपूर शहराचे सुजाण नागरिक या नात्याने शहरात कसलाही अनुचित प्रकार घडणार नाही, ही आपली जबाबदारी आहे. सामाजिक सलोख्याचे प्रतीक म्हणून नागपूर शहराकडे पाहिले जाते. ही शहराची परंपरा आपण सर्वांनी जपावी असं ही ते म्हणाले.
जलजीवन योजनेच्या निकृष्ट बांधकामाने दोन विद्यार्थिनींचा घेतला बळी
डहाणू मध्ये जलजीवन योजनेच्या निकृष्ट बांधकामाने दोन विद्यार्थिनींचा बळी घेतला आहे. पाण्याच्या टाकीच्या आठवड्याचा स्लॅब कोसळून दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे, तर एक गंभीर जखमी आहे.
पाण्याच्या टाकीवर चढलेल्या विद्यार्थिनींचा कठड्याचा स्लॅब कोसळून मृत्यू झाला आहे. डहाणू तालुक्यातल्या सुखडआंबा गावात ही दुर्दैवी घटना घडली.
शांतता राखण्याचे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचे आवाहन
नागपूरमध्ये झालेली घटना आत्ताच माझ्या पर्यंत पोहोचली आहे. दोन्ही समाजाच्या लोकांनी शांतता ठेवावी. अफवांना बळी पडू नये असा आवाहन केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी केले आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या आहेत. जीवीत हानी होता कामा नये. हा विषय शांततेच्या मार्गाने सोडवावा, असं ही त्या म्हणाल्या.
सत्ताधाऱ्यांच्या समर्थक संघटनांनी गालबोट लावले - विजय वडेट्टीवार
नागपूर हे अतिशय शांत शहर असताना त्याला सत्ताधाऱ्यांच्या समर्थक संघटनांनी गालबोट लावलेले आहे. हे सगळं मंत्रिमंडळातील बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांमुळे झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. जाणून बुजून दोन समाजात द्वेष पसरवणे, भांडण लावणे हे उद्योग केले जात आहेत. हे सत्ताधारी करत आहेत. असा आरोपही त्यांनी केला. नागपूरकरांनी शांतता बाळगावी, कोणताही गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी असं आवाहन ही वडेट्टीवार यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरकरांना शांततेचे आवाहन
नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
नागपूरच्या महाल परिसरात दोन गटात दगडफेक
नागपूरच्या महाल परिसरात दोन गटात दगडफेक झाली आहे. काही नागरिक आणि दोन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांचा फौज फाटा घटना स्थळी दाखल झाला आहे. सध्या तणावपूर्ण स्थिती आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून शांततेचं आवाहन करण्यात येत आहे.
सातारा पाच लाखाची लाच प्रकरणात न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाचा दणका
पाच लाखाची लाच प्रकरणातील न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे. त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला आहे. धनंजय निकम यांनी पाच लाखाची लाच मागितल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा आणि पुणे लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली होती. जिल्हा न्यायालयाकडून अटकपूर्व जामिन नाकारल्यानंतर त्यांनी मंबई हायकोर्टात धाव घेतली होती.
धनंजय निकम यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.
टोरेस प्रकरणात चार्जशीट दाखल
टोरेस प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने चार्जशीट दाखल केली आहे. 27 हजार 134 पानांची ही चार्जशीट आहे. अशी माहिती आर्थिक गुन्हे विभागानं दिली आहे.
प्रतापराव पवार यांच्या पत्नीचं पुण्यात निधन, प्रतापराव पवार शरद पवारांचे बंधू
प्रतापराव पवार यांच्या पत्नीचं पुण्यात निधन झाले आहे. प्रतापराव पवार हे शरद पवारांचे बंधू आहेत. प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार याचं पुण्यात निधन झालं आहे.
पुणे सोलापूर महामार्गावर अपघात, 12 जण जखमी
पुण्याच्या इंदापूर मधून मोठी बातमी आहे. पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यातील काळेवाडी नंबर 1 येथे ह्युडाई कंपनीच्या कार ला पाठीमागून धडक दिल्याने पिक अप आणि हुंडाई कारचा अपघात झाला आहे.यात 10 ते 12 लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून हे सर्व लोक दौंड तालुक्यातील कानगाव मधील असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.
Satish Bhosale: खोक्या विरोधात होणार मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण
सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या विरोधात बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी ग्रामस्थ आणि वन्यजीव प्रेमी बेमुदत उपोषण करणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हे उपोषण 20 मार्चपासून बेमुदत केले जाणार असून त्याची परवानगी उपोषणकर्त्यांना मिळाली आहे.
जोपर्यंत या घटनेतील इतर आरोपी अटक होत नाही. संबंधित अधिकारी आणि व्यक्तींचा सीडीआर तपासला जात नाही. एसआयटी स्थापन होत नाही. तसेच खोक्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली जात नाही. तोपर्यंत उपोषणातून माघार घेणार नाही असा निर्धार यावेळी करण्यात आला आहे.
LIVE Update: पाडवा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु, राज ठाकरेंनी बोलावली बैठक
उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक
बैठकीसाठी मनसेचे नेते,सरचिटणीस,मुंबईतील प्रमुख पदाधिकारी राहणार उपस्थित
सायंकाळी सहा वाजता सावरकर सभागृह दादर येथे बैठक.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उद्याची बैठक
30 मार्च रोजी मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क मैदान येथे पार पडणार आहे.
LIVE Updates: महाराष्ट्रातील खासदारांना राष्ट्रपती भवनाकडून नाश्त्याचे निमंत्रण
महाराष्ट्रातील खासदारांना राष्ट्रपती भवनाकडून नाष्ट्याचं निमंत्रण
सर्वपक्षीय खासदार आणि मंत्र्यांना राष्ट्रपती भवन कडून निमंत्रण
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडून सर्व खासदारांना नाश्त्यासाठी निमंत्रण
19 मार्चला सकाळी 9.30 वाजता भेटीसाठी बोलावलं
Navi Mumbai News: नवी मुंबईत विद्यार्थ्यांसाठी घनकचरा व्यवस्थापनाची जनजागृती मोहीम
मास्टेक फाउंडेशन आणि ग्रामीण प्रगती फाउंडेशन यांनी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक २८, वाशी येथे विद्यार्थ्यांसाठी घनकचरा व्यवस्थापनावर जनजागृती मोहीम आयोजित केली. ग्रामीण प्रगती फाउंडेशनचे सीईओ मंगेश डाफळे यांनी विद्यार्थ्यांना घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी कचरा व्यवस्थापनात ओला, सुका कचरा वर्गीकरण आणि प्लास्टिकचा वापर टाळण्याची शपथ घेतली. दोन्ही संस्था गेल्या वर्षभरापासून नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका शाळांमध्ये जनजागृती करत असून, त्यांनी आतापर्यंत १ लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत हा संदेश पोहोचवला आहे.
Akola Accident: अकोल्यात भीषण अपघात, 3 जण जखमी
अकोला हैद्राबाद महामार्गावरील वाशिमच्या तोंडगाव टोलप्लाझा कर्मचाऱ्याने रात्री 10 वाजे पासून कामबंद आंदोलन सुरू केलंय. तर कंपनीने बॉन्सर बोलावून दमदाटी केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.
टोल प्लाझा कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केल्याने टोल कम्पनीच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली रात्री दहा वाजेपासून सकाळी दहा वाजेपर्यंत साधारणता या टोल प्लाजा साडेआठ लाख रुपयांचा नुकसान झाल्याचं कंपनी कडून सांगण्यात आलं.तर टोल प्लाझा कंपनीने कर्मचाऱ्यांच्या या वागणुकी विरुद्ध वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून येथील कर्मचाऱ्यांना टोल प्लाझा वरून बाहेर काढण्यात आलय
Accident News: वांगणी-बदलापूर रोडवर भीषण अपघात, 3 जखमी
सोमवारी सकाळच्या सुमारास वांगणीतील गणेश घाटाजवळ हा अपघात झाला. दुचाकीवर बसून तिघेजण बदलापूरच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी बदलापूरच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार थेट बाईकला धडकली. या अपघातात सचिन म्हसे, ऋषिकेश झांजे, श्रीधर झांजे यांच्या हाता पायाला दुखापत झालीय. अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय.
Live Update : प्रशांत कोरटकर सुनावणीसाठी कोल्हापुरात दाखल
प्रशांत कोरटकर सुनावणीसाठी कोल्हापुरात दाखल
कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणी होणार
कोरटकर व्हिसीद्वारे उपस्थित राहण्याची शक्यता
Live Update : लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या आईला भरपाई नाकारणाऱ्या मध्य रेल्वेला उच्च न्यायालयाचा झटका
लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या आईला भरपाई नाकारणाऱ्या मध्य रेल्वेला उच्च न्यायालयाने झटका दिला. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी मृत तरुणाच्या आईचा दावा मान्य करीत आठ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली. रेल्वेने भरपाई द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 16 ऑक्टोबर 2012 रोजी उल्हासनगर-अंबरनाथदरम्यान तरुण लोकलमधून खाली पडला होता. त्यात गंभीर दुखापत होऊन तरुणाचा मृत्यू झाला होता, याकडे लक्ष वेधत तरुणाची आई गीता ठाकूर यांनी ॲड. दीपक आजगेकर यांच्यामार्फत अपील दाखल केले होते.
Live Update : विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने शितल मात्रे नाराज, शायरीच्या माध्यमातून व्यक्त केली खदखद
विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने शितल मात्रे नाराज, शायरीच्या माध्यमातून व्यक्त केली खदखद
एका शायरीच्या माध्यमातून व्यक्त केली खदखद.
शितल म्हात्रे यांनी ट्विट करून व्यक्त केली नाराजी
Live Update : तेलंगणा आणि कर्नाटकातील बनावटी सौंदर्य प्रसाधनांची महाराष्ट्रात विक्री, कारवाईचे आदेश
विधानसभेत बेकायदेशीरपणे सौंदर्य प्रसाधने विक्रीचा आणि सौंदर्य प्रसाधनातील स्टेरॉइडच्या अतिरिक्त वापराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावर उत्तर दिलं. अनेक सौंदर्य प्रसाधने कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातील असल्याचं त्यांनी सभेत सांगितलं. पुढच्या कॅबिनेटमध्ये हा विषय घेऊन रितसर चर्चा करणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. याशिवाय हे अधिवेशन संपेपर्यंत बेकायदेशीरपणे सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असंही ते म्हणाले.
Live Update : कोल्हापूर, संभाजीनगरात बजरंग दल आक्रमक..., जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड
कोल्हापूर, संभाजीनगरात बजरंग दल आक्रमक...
औरंगजेबाच्या कबरीवरुन वातावरण तापलं...
कोल्हापुरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड
औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी बजरंग दल आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Live Update : शिवरायांचं दर्शन घेतल्याशिवाय कुठल्याचं देवाचं दर्शन फळणार नाही - देवेंद्र फडणवीस
भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जनतेशी संवाद साधला. हनुमानाचं दर्शन घेतल्याशिवाय प्रभू रामाचं दर्शन पूर्ण होत नाही. तसं छत्रपती शिवरायांचं दर्शनाशिवाय कुठल्याचं देवाचं दर्शन आपल्याला फळणार नाही. म्हणून शिवरायांच्या मंदिर स्थापनेसाठी प्रयत्न केले.
- देवेंद्र फडणवीस
Live Update : विधान भवन परिसरात विरोधकांची घोषणाबाजी...
विधान भवन परिसरात विरोधकांची घोषणाबाजी...
Live Update : धुळ्यात मोठ्या प्रमाणात शेती पीक जळून खाक, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट
धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पारोळा चौफुली परिसरात कृषी महाविद्यालय जवळील शेत शिवारात आज अचानक लागली आग... अचानक लागलेल्या या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात शेती पीक जळून खाक... ती आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप पर्यंत अस्पष्ट असले तरी या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच धुळे महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाच्या पथकास माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन विभागाच्या तीन बंबांच्या आधारे आग विझविण्यात यश आले असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
Live Update : कमी कालावधीत जास्त उत्पादन म्हणून ओळख असलेल्या दोडक्याची लागवड..
कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून ओळख असलेल्या दोडका पिकाची शेतकऱ्यांकडून लागवड केली जात आहे, हिंगोलीच्या भांडेगाव परिसरामध्ये सध्या मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने शेतकरी भाजीपाला वर्गीय पिकाच्या लागवडीवर भर देत आहेत. भांडेगाव येथील एका शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रामध्ये दोडका पिकाची लावगड केली असुन सध्याचे कोरडे हवामान दोडका पिकाला प्रतिकूल असल्याने पीक बहरले आहे,
Live Update : अमरावतीत लाडक्या बहिणींची संख्या 22 हजारांनी घटली
अमरावतीत लाडक्या बहिणींची संख्या 22 हजारांनी घटली
अमरावती जिल्ह्यातील सहा लाख 98 हजार 536 महिलांना मिळाला लाभ...
होळीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावर दीड हजार जमा...
दोन हप्त्याच्या आश्वासन, पण प्रत्यक्षात एक महिन्याचीच दीड हजारांची रक्कम जमा..
अडीच लाखांच्यावर उत्पन्न असलेल्या बहिणींना वगळले...
अमरावती जिल्ह्यातील 22 हजार 67 लाडक्या बहिणींचे अर्ज रिजेक्ट, अनुदानाला ही मुकावे लागले
Live Update : आश्रमशाळेतील शिक्षकाच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रातील शिक्षक आक्रमक
बीड शहरातील एक आश्रम शाळेतील शिक्षकांने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. बीडच्या धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या केल्याचे कारण समजल्यानंतर महाराष्ट्र अनेक शिक्षक संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. यातच महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय जिल्हा परिषद शिक्षक संघटनने आक्रमक इशारा देत संचालकांवर कडक कारवाई करा अशी मागणी केली आहे.
Live Update : छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आणि महाआरती करून शिवप्रेमींचा जल्लोष
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार असलेल्या जयंती निमित्त रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर छत्रपतींचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती करून शिवप्रेमींनी जल्लोष साजरा केला याप्रसंगी मोठ्या संख्येने शिवप्रेमींची उपस्थिती होती.
Live Update : करमतारा कंपनीला गुंदले ग्रामस्थांचा तीव्र विरोध
बोईसर पूर्वेकडील गुंदले ग्रामपंचायत हद्दीतील प्रस्तावित करमतारा कंपनी सुरू करण्यासाठी ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला आहे, या प्रदूषणकारी कंपनीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर तसेच, वाईट परिणाम होणार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शिवाय कंपनीमुळे पालघर बोईसर सह वसई विरारला पाणीपुरवठा करणारी सूर्या नदी प्रदूषित होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. या कंपनी विरोधात ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला. शिवाय ग्रामपंचायतीने देखील प्रस्तावित कंपनीच्या जागी कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा विरोध डावळून कंपनी सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा विशाल ग्रामस्थांनी दिला आहे.