Mumbai News: पोलिसांची जिद्द! ना फोटो, ना पत्ता.. 45 वर्ष गुंगारा देणारा 'पोपट' गजाआड, सांगलीमधून उचललं

एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील ७२ वर्षीय पोपट गोविंद वायदंडे याला पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातून अटक केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Trombay Police News:  मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि ट्रॉम्बे पोलिसांनी एका अशा गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत, जो गेल्या साडेचार दशकांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. १९८१ मध्ये ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील ७२ वर्षीय पोपट गोविंद वायदंडे याला पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातून अटक केली आहे.

मुंबई पोलिसांची जिद्द, 45 वर्षांनी आरोपी गजाआड!

​या प्रकरणाची विशेष बाब म्हणजे, पोलिसांकडे आरोपीचा कोणताही फोटो, मोबाईल नंबर किंवा डिजिटल पुरावा उपलब्ध नव्हता. केवळ 'ह्युमन इंटेलिजन्स' आणि जुन्या कागदपत्रांमधील पुसटशा खुणांच्या आधारे हा शोध पूर्ण करण्यात आला. न्यायालयाने ८२ कलमान्वये जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर या केसच्या फाईल्स पुन्हा उघडल्या गेल्या. तपासादरम्यान पोलिसांना गोवंडीतील एका मृत व्यक्तीच्या नातेवाईकाकडून आरोपीच्या संभाव्य वास्तव्याबद्दल माहिती मिळाली.

Advertisement

Solapur Crime: हृदयद्रावक! पित्याने 3 मुलींना विष पाजलं, स्वतःही आयुष्य संपवलं, भयंकर घटनेने सोलापुरात खळबळ

पीएसआय शरद नाणेकर यांच्या पथकाने जुन्या फाईल्स धुंडाळल्या तेव्हा त्यांना एका जुन्या मित्राचा पत्ता लागला. तो मित्र हयात नसला तरी त्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या एका लहानशा धाग्याने पोलिसांना सातारा जिल्ह्यातील शेनोलीपर्यंत पोहोचवले. तेथे वायदंडे याच्या पत्नीचा शोध लागला. दारूचे व्यसन आणि हिंसाचारामुळे तिने त्याच्याशी संबंध तोडले होते, पण तिच्याकडून मिळालेल्या माहितीमुळे पोलिसांना पुढची दिशा मिळाली.

​आरोपी पोपट वायदंडे हा अतिशय सराईतपणे आपली ओळख लपवत होता. तो कधीही एका ठिकाणी सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ राहत नसे. त्याने आपली ओळख लपवण्यासाठी टोपणनावाचा वापर केला होता. सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या सीमेवर त्याचा शोध घेत असताना पोलिसांना त्याची पूर्वश्रमीची पत्नी बेगम ही शेनोली रेल्वे स्थानकाजवळील एका झोपडीत आढळली. 

कसा दिला पोलिसांना गुंगारा! 

तिच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस सांगलीच्या दिशेने रवाना झाले. अखेर, आंबेगाव (ता. कडेगाव) येथील एका शेतात काम करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या जुन्या मतदार ओळखपत्रावरून त्याची ओळख पटवण्यात आली. दरम्यान, पोपट वायदंडे हा केवळ एका गुन्ह्यापुरता मर्यादित नव्हता. त्याच्यावर महाराष्ट्रभरात ९ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Arjun Tendulkar: मुंबई इंडियन्सशी रक्ताचं नातं, तरीही अर्जुननं का सोडली साथ? पहिल्यांदाच सांगितलं कारण

१९८१ मध्ये त्याला मुंबईतून तडीपार देखील करण्यात आले होते. तो अत्यंत चलाखीने आपली ओळख लपवत असे. कधी गॅरेजमध्ये तर कधी शेतात मजूर म्हणून काम करणारा हा आरोपी एका ठिकाणी ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ कधीच थांबला नाही. अखेर सांगलीच्या एका शेतात काम करून विसावा घेत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मुंबई पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. 

Advertisement