आजोबांकडे शिकायला आली अन् घात झाला,चिमुकलीचा जीव गेला, शाळेत काय झालं?

अर्चना खैरनार ही विद्यार्थिनी धुळे तालुक्यातील निमखेडी जिल्हा परिषद शाळेत शिकत होती. ती पहिलीच्या वर्गात होती. तिचे वय सात वर्ष होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
धुळे:

नागिंद मोरे

निमखेडी जिल्हापरिषदेच्या शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. धुळे जिल्हा परिषदेची ही शाळा आहे. या शाळेत एका  सात वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अभ्यास करत असताना चिमुकलीने पेन तोंडात घातला होता. त्याच वेळी पेनाचे टोपण तिच्या घशात अडकले. त्यामुळे तिला श्वास घेता येत नव्हता. तिचा श्वास गुदमरला. शिक्षकांनी टोपण काढण्यासाठी तिची पाठ थोपटली. पण काही उपयोग झाला नाही. शेवटी तिला रूग्णालयात नेण्यात आलं. पण फार उशिर झाला होता. तिला डॉक्टरांनी मृत घोषीत केलं. त्यामुळे संपूर्ण शाळेसह तिच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अर्चना खैरनार ही विद्यार्थिनी धुळे तालुक्यातील निमखेडी जिल्हा परिषद शाळेत शिकत होती. ती पहिलीच्या वर्गात होती. तिचे वय सात वर्ष होते. शाळेत असताना पेनाचं टोपण तिच्या घशात अडकले. अर्चना  ही शाळेत अभ्यास करत होती. त्यावेळी  तिने पेनाचं टोपण तोंडात धरलं होतं. अचानक ते टोपण तिच्या घशात अडकलं. त्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. शिक्षकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तिच्या पाठीवर थापटी मारून टोपण काढण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, प्रयत्न असफल ठरला.  अर्चनाला नातेवाईक आणि शिक्षकांच्या मदतीने धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, श्वास गुदमरल्याने रुग्णालयातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'शरद पवार, अजित पवार एकत्र येणार? रोहित पवारांच्या आईंचे सर्वात मोठे विधान

या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. शाळा परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे. अर्चनाच्या आकस्मिक मृत्यूने शिक्षक, सहकारी विद्यार्थी आणि पालक यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुख्याध्यापक सुहास जैन यांनी अर्चनाबद्दल दुःख व्यक्त करताना सांगितले की, ती अतिशय हुशार विद्यार्थिनी होती. या घटनेने मुलांच्या सुरक्षिततेबाबत सावधगिरी बाळगण्याची अधिक गरज आहे. पालक आणि शिक्षकांनी मुलांच्या सवयींकडे अधिक लक्ष देणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - मंत्रिपदासाठी अनेकांची फिल्डिंग; पण एकनाथ शिंदेंनी 4 निकष ठरवले; कशी होणार नेत्यांची परीक्षा?

अर्चनाचे अजोबा हे निमखेडीचे रहिवाशी आहे. त्यांच्याकडेच ती शिक्षणासाठी होती. तिला चांगलं शिकवायचं, मोठं करायचं असं तिच्या कुटुंबाचं स्वप्न होतं. ती अभ्यासातही हुशार होती. अशा वेळी ही अप्रिय घटना घडली. त्यामुळे सर्व कुटुंब हादरून गेलं आहे. चालण्या खेळण्याच्या वयात या चिमुकलीला मृत्यूने गाठलं. त्यामुळे शाळा, तिचे वर्ग मित्र मैत्रिणी हे सुद्धा सुन्न झाले आहेत. नक्की काय घडलं याचाच ते विचार करत आहेत. 

Advertisement