
रेवती हिंगमिरे, पुणे:
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावे ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्याचा आदर केला पाहिजे.. असे सर्वात मोठे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केले आहे. एक दिवसआधी दिल्लीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची भेट आणि त्यानंतर आता पवार कुटुंबातील सदस्याने केलेल्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हणाल्यात सुनंदा पवार?
'दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावे ही कार्यकर्त्याची इच्छा आहे त्याचा आदर केला पाहिजे. दोन्ही पिढ्या कित्येक वर्षे आम्ही एकत्र राहतोय. मलाही वैयक्तिकपणे त्यांनी एकत्र यावे असे वाटते. याबाबतचा निर्णय पवार साहेब आणि अजित दादाच घेतील. पवार साहेब यांचा काल वाढदिवस होता. कालची भेटही कौटुंबिक होती सगळ त्यांना भेटण्यासाठी गेले होते यात गैर नाही,' असं सुनंदा पवार म्हणाल्या.
राजकारणात कार्यकर्ता महत्वाचा असतो, त्यामुळे विखुरलेला राहण्यापेक्षा एकत्र राहिलेले चांगले. फाटलेलं कुटुंब आहे. सगळे एकत्रित होतो, आम्ही स्वतंत्र काम करतो. कुटुंबियांची ताकद आहे, त्यामुळे एकत्रित यावे असे मलाही वाटते. तसेच राष्ट्रवादीमध्ये नवीन लोकांना संधी दिली पक्षाने हे चांगल आहे. त्यामुळे रोहितने हे सुचवले आहे. राज्यात आलेल्या विधानसभा निकालावर माझा विश्वास नाही. राज्यात एवढी नाराजी अनेक प्रक्षावर असताना हे निकाल पटत नाही. दादा भेटतील तेव्हा शुभेच्छा नक्की देईल, असंही त्या म्हणाल्यात.
दरम्यान, 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस होता. राज्यसभेचे कामकाज सुरु असल्यामुळे शरद पवार सध्या दिल्लीत आहेत. दुसरीकडे अजित पवारही त्याचवेळी दिल्लीमध्ये अजित पवारही दिल्लीत होते. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी शरद पवार यांचे 6 जनपथला भेट दिली. काका- पुतण्यामध्ये झालेली ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. अशातच सुनंदा पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world