तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्णचं राहीलं, शेतकऱ्याच्या लेकीचं टोकाचं पाऊल

नीट परिक्षा देवून डॉक्टर व्हायचं हे तिचं स्वप्न होतं. डॉक्टर होवून घरची स्थिती सुधारायची अशी तिची भावना होती. पण नियतीला ते कदाचित मान्य नव्हतं.

Advertisement
Read Time: 3 mins
हिंगोली:

दिनेश कुलकर्णी 

दीपिका खंडारे परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातल्या आहेरवाडी गावची रहिवाशी. वडील अल्पभूधारक शेतकरी. पण दीपिका लहान असतानाच वडिलांचे छत्र हरपले. एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सर्व जबाबदारी आईवर आली. आई आणि तीन लेकरं असं त्याचं कुटुंब. दीपिका ही सुरूवातीपासूनच अभ्यासात हुशार होती. दहावीला तिने जवळपास 94 टक्के मार्क्स मिळावले होते. त्यानंतर तिने सायन्सला प्रवेश घेतला होता. सध्या ती 12 वी सायन्सला शिकत होती. नीट परिक्षा देवून डॉक्टर व्हायचं हे तिचं स्वप्न होतं. डॉक्टर होवून घरची स्थिती सुधारायची अशी तिची भावना होती. पण नियतीला ते कदाचित मान्य नव्हतं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

दीपिकाचं टोकाचं पाऊल 

आहेरवाडी गावातील दीपिका दौलत खंदारे. वय अवघ 17 वर्षाचे.ही विद्यार्थिनी पूर्णा येथील एका महाविद्यालय 12 वी विज्ञान शाखेत शिकत होती.नीट परीक्षेतून वैद्यकीय कोर्स पूर्ण करून डॉक्टर होण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी तिची धडपड सुरु होती. शिक्षण घेताना गरिबीमुळे आर्थिक समस्या तिला नेहमी भेडसावत होत्या. या तणावात ती नेहमी असायची. आई मोठी बहिण जी बी फार्म करत होती. तर छोटा भाऊ दहावीत शिकत होता. त्यात वसमत इथे भाड्याच्या घरात रहावे लागत होते. तीन मुलांचे शिक्षण, घरभाडे,या सर्वांचा भार आईवर येत होता. ही बाब ती बघत होती. अशा स्थितीत तिने आपल्या वसमत येथील विद्यानगर भागातील भाड्याने राहणाऱ्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. 

ट्रेंडिंग बातमी - सांगलीतील 'आदर्श' तलाठ्याचा कारनामा; सातबारा उताऱ्यामुळे फुटलं बिंग 

घरच्यांना मोठा धक्का 

दीपिकी हा हुशार होती. डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न होते. त्या दृष्टीने ती मेहनतही घेत होती. घरच्यांनाही ती डॉक्टर होईल अशी अपेक्षा होती.दीपिकाची आई त्यासाठी काबाड कष्ट करत होती. तिन्ही मुलांना शिकवत होती. पण होणारी ओढताण दीपिकाला सहन झाली नाही. यातून तिने गुरवारी रात्री टोकाचं पाऊल उचललं. तिने घेतलेल्या या निर्णयाचा जबर धक्का तिच्या घरच्यांना बसला आहे. हाता तोंडाला आलेली हुशार लेक गेली.त्यामुळे तिच्या आईची स्थिती वाईट झाली आहे. लेकीला डॉक्टर करायचं म्हणून त्या मेहनत करत होत्या. पण तिने सर्वांनाच अर्ध्यावर सोडून जाणे पसंत केले. हा धक्का दीपिकाच्या कुटुंबाला बसला आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  दगडफेक,जाळपोळ, हल्ला, जामनेरमध्ये भयंकर घडलं, कारण काय? 

दीपिका चुकलीच 

दीपिकाच्या जाण्यामुळे तिच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दीपिकाच्या कुटुंबात आईसह जना खंदारे ही तिची मोठी बहिण आहे. ती बी फार्मसीचा अभ्यास करत आहेत. तर गजानन खंदारे हा लहान भाऊ आहे. तो दहावीला आहे. या दोघांची शिक्षण सुरू आहे. त्यांनाही दीपिका डॉक्टर होईल असे वाटत होते.पण तिने अचानग एक्झिट घेतली. दीपिकाची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. त्यामुळे दीपिकाच्या दोन्ही भावंडांचीही आर्थिक कुचंबना होत आहे. त्याचा परिणाम शिक्षणावर होत आहे. अशा स्थितीत या कुटुंबाला मदतीची अपेक्षा आहे.

Advertisement