जाहिरात
Story ProgressBack

दगडफेक,जाळपोळ, हल्ला, जामनेरमध्ये भयंकर घडलं, कारण काय? 

एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर जामनेरमध्ये संतापाची लाट उसळली.

Read Time: 3 mins
दगडफेक,जाळपोळ, हल्ला, जामनेरमध्ये भयंकर घडलं, कारण काय? 
जळगाव:

मंगेश जोशी 

जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये सर्वांनाच हादरवून टाकणारी घटना घडली आहे. इथे एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर जामनेरमध्ये संतापाची लाट उसळली. सर्व जमाव पोलिस स्थानकावर चाल करून गेला.जमावाने आरोपीला आपल्या ताब्यात द्यावे अशी पोलिसांकडे मागणी केली. जमाव मोठ्या संख्येने जमला होता. त्यामुळे पोलिसांनाही संयमाने घ्याले लागले. मात्र जमावाचा राग अनावर झाला. त्यांनी कायदाच हातात घेतला. आणि त्यानंतर जामनेर पोलिस स्थानका बाहेर भयंकर घडलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

सहा वर्षाच्या चिमुकलीवर एकाने अत्याचार केला. त्यानंतर तिची हत्या केली. पोलिसांनीही आरोपीला तातडीने अटक केली. ही बातमी शहरात वाऱ्या सारखी पसरली. त्यानंतर संतप्त जमावाने जामनेर पोलिस स्थानकाकडे आपला मोर्चा वळवला. आरोपीला आपल्या ताब्यात द्यावे अशी जमावाने मागणी केली.कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न त्यावेळी निर्माण झाला. पोलिसांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण जमाव काही ऐकण्याच्या स्थिती नव्हता. तो आक्रमत झाला होता. त्याला आमच्या हवाली करा त्याला आम्ही शिक्षा देतो अशी सर्वांची भावना होती. याच भावनेचा मग उद्रेक झाला.  

ट्रेंडिंग बातमी - '... त्यासाठी बिनशर्त पाठिंबा दिला नव्हता' ठाकरे ठाकरेंवर भडकले

 जमावाने पोलिस  स्टेशनवर तुफान दगडफेक केली. त्यात सहा ते सात पोलीस कर्मचारी हे जखमी झाले. जमाव यावरच शांत झाला नाही. त्यांनी तिथे असलेल्या वाहनांची देखील जाळपोळ केली. मोठ्या परिश्रमाने पोलिसाने जमावाला पांगवले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त  तैनात करण्यात आला. सद्यस्थितीत जामनेर शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

नेमकं काय झालं?

जामनेर तालुक्यातील एका गावात 11 जून रोजी एका 6 वर्षीय बालिकेवर 35 वर्षीय नराधमाने अत्याचार करत हत्या केल्याची घटना घडली होती.  या घटनेनंतर तो फरार होता. दरम्यान नराधमाच्या शोधासाठी पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू होते. अखेर गुरुवारी रात्रीच्या सुमारास संशयित आरोपी सुभाष इमाजी भिल हा भुसावळ शहरात आढळून आल्याने काही जणांनी त्याला मारहाण  केली. त्यादरम्यान भुसावळ बाजारपेठ पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संशयित आरोपीला ताब्यात घेतले. मात्र  त्याला ताब्यात घेतल्यानंतर भुसावळ व जामनेर पोलीस स्टेशन समोर मोठ्या संख्येने जमाव जमला होता. नराधमाला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी संतप्त जमावाने जामनेर पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन देखील केले. या आंदोलनानंतर पोलिसांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त जमावाने दुचाकी वाहनाची जाळपोळ करत पोलीस स्टेशन, पोलिसांवर तुफान दगडफेक केल्याने जामनेर शहरात तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणा बाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांची मोठी कुमक मागवण्यात आली. या दगडफेकीत एका पोलीस अधिकाऱ्यासह सहा ते सात पोलीस कर्मचारी हे जखमी झाले. जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळाला भेट देऊन नागरिकांना शांततेचे आवाहन केले. सदर घटनेनंतर जामनेर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आला असून सद्यस्थितीत शहरात तणावपूर्ण शांतता आहे. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीताला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
NDTVच्या बातमीची दखल, 'त्या' धोकादायक व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल; अज्ञात तरुण-तरुणीचा शोध सुरू 
दगडफेक,जाळपोळ, हल्ला, जामनेरमध्ये भयंकर घडलं, कारण काय? 
Talathi honored with Adarsh ​​Award caught red-handed by the Anti-corruption Department officials
Next Article
सांगलीतील 'आदर्श' तलाठ्याचा कारनामा; सातबारा उताऱ्यामुळे फुटलं बिंग 
;