जाहिरात

Shocking VIDEO: रिल्सच्या व्यसनाने भयंकर अवस्था! गाढ झोपलेली चिमुकली अन्... दृश्य पाहून पालक हादरले

सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सतत मोबाईलवर रिल्स पाहणाऱ्या एका चिमुकलीची झोपेतही कशी अवस्था झाली आहे, हे पाहायला मिळत आहे. 

Shocking VIDEO: रिल्सच्या व्यसनाने भयंकर अवस्था! गाढ झोपलेली चिमुकली अन्... दृश्य पाहून पालक हादरले

Little Girl Mobile Addiction Viral Video:  अलिकडच्या काळात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच सोशल मीडियाचं वेड लागले आहे. लहान मुलंही सतत मोबाईल पाहत असतात, रिल्स स्क्रोल करत असतात.  मात्र मोबाईल, सोशल मीडियाच्या अतिवापर घातक आहे. या मोबाईलच्या वेडाचा लहान मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सतत मोबाईलवर रिल्स पाहणाऱ्या एका चिमुकलीची झोपेतही कशी अवस्था झाली आहे, हे पाहायला मिळत आहे. 

Pune News: पुरंदर विमानतळ की 'लँड जिहाद'चे केंद्र? जमिनींच्या खरेदी प्रकरावरून पुण्यातील सकल हिंदू समाज आक्रमक

नेमका काय आहे व्हायरल व्हिडिओ? 

सोशल मीडियावर दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी भीषण अपघात, मारहाणीचे व्हिडिओ लक्ष वेधत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे अनेक व्हिडिओ असे असतात की नेटकरीही अवाक होतात. अशाच व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक चिमुकली हातात मोबाईल घेऊन गाढ झोपल्याचे दिसत आहे. मात्र झोपेत असतानाच ती असं काही करते की सर्वजण चिंतेत पडतात.

ही चिमुकली झोपेत असतानाही हातात पकडलेल्या मोबाईलवर बोटाने रिल्स स्क्रॉल करतानाची ऍक्शन करत आहे. सतत मोबाईल वापरल्याने, सोशल मीडिया पाहिल्याने आणि रिल्स स्क्रॉल केल्याने या चिमुकलीच्या बोटांना त्याची इतकी सवय झाली आहे की झोपेतही ती तशीच कृती करत आहे. सतत चिमुकल्यांच्या हातात मोबाईल देणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ विचार करायला लावणारा आहे. मुलांच्या हातात मोबाईल देण्याचे किती भयंकर परिणाम असू शकतात हेच या व्हिडिओमधून दिसत आहे. 

पालकांनी काय काळजी घ्यावी?  How to control mobile Addiction

  • 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मोबाईल वापरण्यासाठी एक निश्चित वेळ आखून द्यावी. 
  • मुले मोबाईलमध्ये काय पाहतात? कोणते ऍप्स जास्त वापरतात याबाबत काळजी घ्यावी.
  • मोबाईलच्या अतिवापरामुळे काय काय नुकसान होते? हे मुलांना समजून सांगावे. 
  • मोबाईल व्यतिरिक्त मुलांना इतर गोष्टींमध्ये मन रमवण्यास मदत करावी. 

10 रुपयांची मेथी 600 रुपयात, किमतीवरुन छेडलं 'महायुद्ध'; Video वर प्रतिक्रियांचा पाऊस 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com