Mumbai Crime : लेकीच्या जबाबामुळे आईचं बिंग फुटलं; पतीच्या हत्येचा भयंकर प्लान आखणारा सौंदर्याचा क्रूर चेहरा

धक्कादायक बाब म्हणजे तिच्या वडिलांच्या हत्येचा प्लान करणारी दुसरी तिसरी कुणी नसून तिची सख्खी आईच होती. या मुलीच्या जबाबामुळे तिच्या वडिलांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

सुनील महाडेश्वर, प्रतिनिधी 

Mumbai Crime News : मुंबईतील गोरेगावात राहणाऱ्या 13 वर्षांच्या मुलीच्या साक्षीमुळे तिच्या वडिलांच्या हत्येप्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिच्या वडिलांच्या हत्येचा प्लान करणारी दुसरी तिसरी कुणी नसून तिची सख्खी आईच होती. या मुलीच्या जबाबामुळे तिच्या वडिलांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात आरे कॉलनी पोलिसांनी 35 वर्षीय राजश्री अहिरे हिला प्रियकराच्या मदतीने पती भरत लक्ष्मण अहिरे याला मारण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी आरे कॉलनीतील भरत लक्ष्मण अहिरे याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूचा शोध घेत असताना त्यांच्या 13 वर्षांच्या मुलीने मोठा खुलासा केला. आईचे विवाहबाह्य संबंध सुरू होते. यातून आईने प्रियकराची मदत घेऊन वडिलांच्या हत्येचा प्लान केल्याचं तिने सांगितलं. भरत अहिरे हा एक व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट आहे. तर त्याची पत्नी राजश्री हिचे चंद्रशेखरसोबत विवाहबाह्य संबंध होते.  15 जुलैच्या रात्री 10 वाजताच्या सुमारास प्रियकर  चंद्रशेखरने राजश्रीला गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील एकतानगर येथील युनिट क्रमांक 31 येथील सार्वजनिक शौचालयाजवळ भेटण्यास बोलावले. धक्कादायक म्हणजे, राजश्री तिच्या पतीसोबत भेटीच्या ठिकाणी पोहोचली.



यावेळी चंद्रशेखर मित्र रंगासोबत तिथं पोहोचला. यावेळी भरतने त्याला इथं येण्याबद्दल विचारणा केली. यानंतर प्रियकर चंद्रशेखरने भरतला जबर मारहाण केली. त्याच्या पोटात, छातीत आणि शरीराच्या इतर भागात लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी राजश्रीही तेथे होती. मात्र पती भरतला वाचवायला ती मध्ये पडली नाही. स्थानिक लोक तेथे जमा झाल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. यावेळी भरत जबर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी राजश्रीने त्याला घरी नेलं आणि तीन दिवस वैद्यकीय उपचार केले नाही. 

Advertisement

नवऱ्याला वैद्यकीय उपचाराशिवाय घरात कोंडून ठेवले...

वैद्यकीय उपचाराशिवाय राजश्रीने गंभीर जखमी पतीला तीन दिवस घरात कोंडून ठेवले. 13 वर्षांची लेक हे सर्व पाहत होती. शेवटी वडिलांना त्रास सहन न झाल्याने राजश्री हिची मोठी मुलगी जी सातवीत शिकते तिने नातेवाईकांना कळवले. त्यानंतर नातेवाईकांनी भरतला तातडीने रुग्णालयात दाखल केले. 24 दिवसांच्या उपचारानंतर, 5 ऑगस्ट रोजी भरतचा मृत्यू झाला. सुरुवातीला पत्नीने दावा केला की, तिचा पती दुचाकी अपघातात जखमी झाला होता. मात्र पोलीस चौकशीत राजश्रीच्या मुलीने आपल्या आईचं बिंग फोडलं. आणि आईचे चंद्रशेखर नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं. मुलीच्या साक्षीने वेगळीच कहाणी समोर आली आहे.

Advertisement

मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

भरत याच्या मुलीने वडिलांसोबत काय झालं हे पोलिसांना सांगितलं. आईच्या प्रियकराने वडिलांवर हल्ला केला होता. वडिलंना उपचार न देता तीन दिवस घरी ठेवण्यात आले. या प्रकरणात 13 वर्षीय मुलीच्या साक्षीमुळे आरे कॉलनी पोलिसांनी 35 वर्षीय राजश्री अहिरे हिला तिच्या प्रियकरासोबत मिळून तिचा पती भरत लक्ष्मण अहिरे याला मारण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. तिचीच आई आणि तिच्या प्रियकराने केलेल्या वडिलांच्या हत्येमध्ये 13 वर्षीय मुलगी प्रमुख साक्षीदार म्हणून समोर आली आहे. भरत अहिरे याला पत्नीला विवाहबाह्य संबंधांबद्दल माहीत होतं. त्याने अनेकदा तिला समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला होता. त्याच रागातून राजश्रीने आणि तिच्या प्रियकराने एका क्रूर हल्ल्याचा कट रचला. ज्यात भरतचा मृत्यू झाला.मुलीच्या जबाबावरून आरे कॉलनी पोलिसांनी 35 वर्षीय राजश्री अहिरेला अटक केली आहे. तिच्यावर आणि प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजश्रीचा प्रियकर चंद्रशेखर आणि त्याचा साथीदार रंगा हे सध्या फरार आहेत.
 

Advertisement