Palghar Accident: अतिघाईने घात केला... भरधाव रेल्वेखाली चिरडून दोघांचा मृत्यू; पालघरमधील घटना

पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

पालघर:  गेल्या काही दिवसांपासून राज्यात भीषण अपघाताचे सत्र सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच कुर्ल्यामध्ये बसने चिरडून 14 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशातच आता पालघरमधून रेल्वेने तिघांना चिरडल्याची दुर्घटना घडली आहे. पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळील बंद फाटक ओलांडताना ही दुर्दैवी घटना घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी (27, डिसेंबर)  पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पालघर येथील बंद असलेले जुने रेल्वे फाटक येथे रूळ ओलांडून जाताना विरारहून डहाणूकडे जाणाऱ्या लोकलने तिघांना चिरडल्याने ही भयंकर घटना घडली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.  सोनू राम (वय,35) मनोज कुमार (वय, 18) अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर अनुज पंडित (वय,20) हा गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.

दुसरीकडे घाट कोपरमधूनही एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. घाटकोपरमध्ये भरधाव टेंपो ने पाच ते सहा पदचऱ्यांना चिरडले. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झालेत. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघाताचे कारण समोर आले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Advertisement

( नक्की वाचा : Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या हाती पिस्तूल सोबत वाल्मिक कराड, दमानियांनी दाखवले Video )

अकोल्याच्या मुर्तीजापुर राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी ने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मुर्तीजापुरकडून अकोलाकडे जाणाऱ्यादुचाकीला पाठीमागे येणाऱ्या चार चाकी गाडीची जबर धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, दुचाकीस्वार जमिनीवर कोसळला, अन्  उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला.