Accident news: माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे अपघातात निधन, गोपिनाथ मुंडेचे होते समर्थक

अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. आर.टी. देशमुख हे माजलगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
लातूर:

माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे अपघातात निधन झाले आहे. ते भाजपकडून आमदार म्हणून निवडून आले होते. ते गोपिनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते.  देशमुख हे 2014 मध्ये माजलगाव मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते. तुळजापूर ते औसा महामार्गावर त्यांच्या कारचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की त्यांची कार पुर्ण पणे चेपली गेली होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

देशमुख यांच्या कारचा अपघात  झाल्यानंतर त्यांना लातूरच्या सह्याद्री रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले होते.  मात्र डॉक्टरांनी त्यांना तिथे मृत घोषित केले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात कार उलटली. प्राथमिक माहितीनुसार, देशमुख हे त्यांच्या एसयूव्ही वाहनातून प्रवास करत होते. बेलकुंडीजवळ त्यांच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी पलटी झाली. या भीषण अपघातात देशमुख गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Mumbai Rain: पहिल्याच पावसात मुंबई का तुंबली? ठाकरेंचे प्रश्न एकनाथ शिंदेंची उत्तरं

अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. आर.टी. देशमुख हे माजलगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने एक अनुभवी व प्रगल्भ नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. ते लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय होते. आर. टी. देशमुख हे बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. त्यांनी अनेक वर्षे राजकारणात सक्रिय योगदान दिले आहे. ते अत्यंत लोकप्रिय व कणखर नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने बीड व लातूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.अनेक राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शोक व्यक्त केला आहे.

Advertisement