T20 World Cup 2026 Final: पुढील वर्षी होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकाबाबत सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026चे संपूर्ण वेळापत्रक आता समोर आले आहे. स्पर्धेचा उद्घाटन सामना 7 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे होणार आहे, तर फायनलचा सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. मात्र फायनलचा सामना पुन्हा एकदा गुजरातला होणार असल्याने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
फायनल पुन्हा गुजरातला
आगामी T20 विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा झाल्यानंतर, स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे ठिकाण अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम निश्चित करण्यात आल्याने आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी तीव्र आक्षेप नोंदवत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) थेट सवाल केले आहेत. 'प्रत्येक महत्त्वाचा सामना अहमदाबादलाच का?' असा थेट प्रश्न त्यांनी विचारला आहे.
T20 World Cup 2026 Schedule: भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली! फायनलबाबत ICC चा धक्कादायक निर्णय
आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आयसीसीच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. 'अंतिम सामना अहमदाबादमध्ये खेळवण्यासाठी त्या शहराची क्रिकेटची अशी कोणती ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे?' असा सवाल करत त्यांनी मुंबईसारख्या शहराची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि वानखेडे स्टेडियमची क्रिकेटमधील महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली.
आदित्य ठाकरेंचा संताप
मुंबईला अंतिम सामना न मिळाल्याने त्यांनी यामागे राजकारण असल्याचा आरोप केला आहे. ईडन गार्डन्स (कोलकाता), एम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई) आणि आय.एस. बिंद्रा स्टेडियम (मोहाली) यांसारखी ऐतिहासिक आणि मोठी स्टेडियम्स T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी पूर्णपणे योग्य आहेत. मात्र, केवळ राजकीय दबावामुळे किंवा पक्षपातीपणामुळे महाराष्ट्रासारख्या क्रिकेटची मोठी परंपरा असलेल्या राज्यावर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
( नक्की वाचा : IND vs SA : ऐतिहासिक ! बुमराहने मार्करमचा स्टंप उखडताच 'तो' ब्रेक आला; 148 वर्षांत न पाहिलेला क्षण )