जाहिरात

Admapur Yatra: बाळूमामाच्या भंडारा यात्रेत धक्कादायक प्रकार! 35 भाविक रुग्णालयात; प्रशासन अलर्ट

आदमापुरात भंडारा उत्सवादरम्यान 35 भाविकांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. शीतपेयातून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Admapur Yatra: बाळूमामाच्या भंडारा यात्रेत धक्कादायक प्रकार! 35 भाविक रुग्णालयात; प्रशासन अलर्ट

विशाल पुजारी, कोल्हापूर: 

Admapur Balu Mama Yatra News:  लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भुदरगड तालुक्यातील श्री. क्षेत्र आदमापुरच्या सद्गुरु बाळुमामांचा भंडारा उत्सव सध्या सुरु आहे. या भंडारा उत्सवाला महाराष्ट्र, कर्नाटकमधील लाखो भक्त हजेरी लावतात. मोठ्या भक्तीभावात सुरु असलेल्या या उत्सवादरम्यान एक मोठी घटना घडली आहे. आदमापुरात भंडारा उत्सवादरम्यान 35 भाविकांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. शीतपेयातून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Pune News: पोटभर खा अन्... पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात, समर्थ स्नॅक्स सेंटरच्या निर्णयाने मन जिंकलं

आदमापूरमध्ये भंडारा उत्सवादरम्यान विषबाधा! 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आदमापूर येथे संत बाळूमामांच्या भंडारा उत्सवादरम्यान भाविकांना विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना घडली. दर्शनासाठी आलेला काही भाविकांनी शीतपेय घेतल्यानंतर उलटी, मळमळ, पोटदुखी आणि जुलाब असा त्रास सुरु झाला.. रविवारी रात्री ही घटना घडली. भंडारा उत्सव असल्याने लाखो भाविक आदमपुरात आहेत. 

 त्रास जाणवू लागल्यानंतर 35 जणांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. काहीजणांना मडिलगे बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काहींनागारगोटी उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. या घटनेनं प्रशासन सतर्क झालं आहे. मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असल्यामुळे ही घटना चिंताजनक आहे.

दरम्यान, पाच दिवस चालणाऱ्या या भंडारा उत्सवात लाखो भाविक गर्दी करतात. रविवारी या यात्रेचा मुख्य दिवस होता. या दिवशी निढोरी ते आदमापूर या मार्गावर बाळूमामाच्या रथाची मिरवणूक निघते. त्यानंतर सोमवारी पहाटे कृष्णा महाराज डोणे यांची भाकणूक व महाप्रसाद कार्यक्रम होईल. मंगळवारी बाळूमामाच्या पालखी सोहळ्याचा उत्सव असतो. 

Chhatrapati Sambhajinagar: रील स्टारचा क्रूर चेहरा! 50 लाखांसाठी निवृत्त प्राध्यापकाची हत्या; 40 दिवसांनी छडा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com