Manikrao Kokate On Junglee Rummy Controversy: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कोकाटेंचा राज्याच्या पावसाळी अधिवेशनात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यानंतर त्यांच्यावर चौफेर टिकेची झोड उठली आहे. कृषिमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. याबाबतच आता कृषिमंत्री कोकाटेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणाले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे?
"खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे. हा विषय इतका का वाढला हे समजत नाही. जंगली रमी हा विषय तुम्हाला माहित नाही का? मला रमी खेळता येत नाही. हे सर्व आरोप खोटे आहेत, बिनबुडाचे आरोप आहेत. ज्यामुळे माझी राज्यभरात बदनामी झाली आहे. ज्या ज्या राजकीय नेत्यांनी माझी बदनामी केली त्यांना मी कोर्टात खेचणार आहे," असा इशारा आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी दिला आहे.
Ajit Pawar Birthday: 11 एकरात भव्य फार्म आर्ट, माणिकराव कोकाटेंकडून अजित पवारांना अनोखे बर्थडे गिफ्ट
"ऑनलाईन रमी खेळायला मोबाईल क्रमांक, बँक अकाऊंट जोडावे लागते. अशाप्रकारचे कोणतेही अकाऊंट माझ्याकडे नाही. मी एक रुपयाचीही रमी कधी खेळलो नाही. मी त्यादिवशी मोबाईल उघडल्यानंतर त्या गेमची जाहिरात आली. तो मला स्कीप करता आला नाही. तो व्हिडिओ मात्र तुमच्यापर्यंत आला नाही. पूर्ण खेळ का दाखवला नाही? असा उलट सवाल करत मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांना लेखी पत्र देऊन त्याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार आहे," असेही माणिकराव कोकाटे म्हणालेत.
"या चौकशीत मी दोषी आढळलो तर मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना न सांगता नागपूर अधिवेशनात स्वतः राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा देईन. मात्र आत्ता माझ्या बदनामीमागचा सूत्रधार कोण आहे याची चौकशी व्हावी. मी अनेक वर्ष विधानसभेत आहे. मला विधानसभा, विधानपरिषदेत काय करावे? काय करावे याचे नियम मला माहित आहेत. सध्या अनावश्यक विषय लावून धरला आहे," असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
Manikrao Kokate : कृषिमंत्री कोकाटे राजीनामा देणार? अजित पवारांवर कारवाईसाठी दबाव
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी समृद्धी योजना लॉन्च करत आहोत. कृषीक्षेत्रात गुंतवणूक वाढवणे या या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल. या योजनेमुळे कृषिक्षेत्रात गुंतवणूक वाढणार आहे, असं माणिकराव कोकाटे म्हणालेत.