Manikrao Kokate Video: अधिवेशनात रंगला 'जंगली रम्मी'चा डाव! कृषिमंत्री कोकाटेंचा VIDEO व्हायरल

Manikrao Kokate jungle rummy Video: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्वीट केला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Manikrao Kokate Video: महाराष्ट्र विधिमंडळाचे (Maharashtra Assembly Monsoon Session) पावसाळी अधिवेशन जनसामान्यांच्या प्रश्नांपेक्षा नको त्या कारणांमुळेच जास्त गाजले. विधानभवनात झालेली मारामारी, वादविवादाने हे अधिवेशन ढवळून निघाले. अशातच आता राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्वीट केला आहे. 

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही. आपल्या वादग्रस्त विधानामुळे कृषिमंत्री कोकाटे नेहमीच चर्चेत असतात. अशातच आता त्यांचा राज्याच्या पावसाळी अधिवेशनातील एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते चक्क अधिवेशन सुरु असताना सभागृहात मोबाईलवर पत्त्यांचा गेम खेळत असल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी, असा टोलाही त्यांनी लावला आहे. 

Online Gaming: ऑनलाइन गेमिंगसाठी कायदा करणार, राज्य सरकारची केंद्राला विनंती, CM फडणवीसांची माहिती

एकीकडे राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरु आहे. कर्जमाफी, शेतीमालाला भाव देण्याच्या मागणीकरिता शेतकरी बांधव रस्त्यावर उतरत आहेत. अशातच राज्याचे कृषिमंत्री विधिमंडळ अधिवेशनात पत्त्यांचा डाव मांडतात, हे अत्यंत असंवेदनशील आहे, अशी टीका करत विरोधक आक्रमक झाले आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशीही मागणी केली आहे.

Advertisement

दरम्यान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.  'मी रमी खेळत नव्हतो, व्हायरल झालेला व्हिडिओ विधान परिषदेतील असावा, जेव्हा सभागृह स्थगित झाले होते, तेव्हा मी अपर हाऊसमध्ये काय चालले आहे ते YouTube वर पाहण्यासाठी माझा फोन सुरू केला, तेव्हा जंगली रमीची जाहिरात आली, मी ती वगळत होतो, हा व्हिडिओ त्याच वेळचा आहे.' असं स्पष्टीकरण कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलं आहे.