जाहिरात

Online Gaming: ऑनलाइन गेमिंगसाठी कायदा करणार, राज्य सरकारची केंद्राला विनंती, CM फडणवीसांची माहिती

पैसे गमावल्याच्या नैराश्यातून अनेकांनी आत्महत्येसारखे टोकाची पाऊले उचलली आहेत, त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचा गंभीर मुद्दा कैलास पाटील यांनी विधानसभेत मांडला. 

Online Gaming: ऑनलाइन गेमिंगसाठी कायदा करणार, राज्य सरकारची केंद्राला विनंती, CM फडणवीसांची माहिती

Maharashtra Assembly Monsoon Session 2025: ऑनलाइन गेमिंग बंद करण्यासाठी सध्या कोणताही विशेष कायदा अस्तित्वात नाही. ऑनलाइन लॉटरी व गेमिंगचे विनियमन करण्यासाठी कायदा करण्याबाबत केंद्र सरकारला विनंती केली आहे, त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात विधानसभेत सांगितले. सदस्य कैलास घाडगे पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

Anil Parab : गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावानं मुंबईत डान्सबार, अनिल परब यांचा खळबळजनक आरोप

ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनी विधानसभेत ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणावी, अशी मागणी केली होती.ऑनलाईन गेमिंगमुळे युवकांमध्ये व्यसनाधिनता वाढली आहे.. आर्थिक हव्यासापोटी व जाहिरातबाजीला बळी पडून युवक ऑनलाईन गेमिंगकडे आकर्षित होत आहे.. तरुण पिढी ऑनलाईन गेमिंगच्या विळख्यात अडकून बरबाद होत असून लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहेत. यात पैसे गमावल्याच्या नैराश्यातून अनेकांनी आत्महत्येसारखे टोकाची पाऊले उचलली आहेत, त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचा गंभीर मुद्दा कैलास पाटील यांनी विधानसभेत मांडला. 

याबाबत मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले, ऑनलाइन गेमवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फतच्या माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गतचे नियम  राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ऑनलाइन गेमिंग नियंत्रणासाठी सध्या कोणताही विशेष कायदा अस्तित्वात नाही. ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती प्रतिथयश व्यक्तींनी करून त्याला प्रोत्साहन देऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी सभागृहाच्या माध्यमातून केले.

Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यात 7 नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती, CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com