जाहिरात

Crime News: कोरोनात साधं लग्न केलं म्हणून सासरच्यांनी छळलं, पैशासाठी त्रास; प्रियाने मृत्यूला कवटाळलं

आत्महत्येपूर्वी तिने मोबाईलवरून आपल्या कुटुंबीयांना व्हॉट्सअॅप मेसेज पाठवत आपल्याला होत असलेल्या त्रासाची माहिती दिल्याचेही समोर आले आहे. 

Crime News: कोरोनात साधं लग्न केलं म्हणून सासरच्यांनी छळलं, पैशासाठी त्रास; प्रियाने मृत्यूला कवटाळलं

सुनील दवंगे, अहिल्यानगर: 

Ahilyanagar Crime:  अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यात हुंडाबळीची धक्कादायक घटना समोर आली आहे.  कोरोना काळात तोलामोलाचं लग्न न करु देता साध्या पध्दतीनं लग्न करुन दिल्याने विवाहितेला त्रास दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लग्न टोलेजंग आणि मौजमजेत केल नाही म्हणून सासरच्या मंडळीकडून तिचा छळ केला जात होता. या त्रासाला कंटाळून प्रिया ढगे हिने आत्महत्या केली. सासरच्या मंडळींनी दिलेल्या त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी पती सासू सासरा अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचा राजीनामा! त्यांच्या जागी 'या' 4 नावांची चर्चा, वर्णी कुणाची लागणार?

विवाहितेची आत्महत्या 

समोर आलेल्या माहितीनुसार प्रिया शुभम ढगे असे मृत विवाहितेचे नाव असून तिचा 17 फेब्रुवारी 2022 रोजी राहात्यातील एका मंगल कार्यालयात साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला होता. तिचा पती शुभम ढगे हा राष्ट्रीयीकृत बॅकेत नोकरीला असून साजेसे लग्न केल नाही म्हणून तिला त्रास दिला जात होता.  त्याचबरोबर दोन वर्षापासून घराच्या बांधकामासाठी माहेराहून चार लाख रुपये घेवून ये यासाठी देखील तिचा छळ केला जात होता.

तिला वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ आणि उपाशी ठेवण्याचे प्रकारही घडत असल्याचा आरोप प्रियाच्या नातेवाईकांनी केला. या  छळाला कंटाळून प्रियाने आपल्या माहेरी एकरुखे येथे वडिलांच्या राहत्या घराजवळील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने मोबाईलवरून आपल्या कुटुंबीयांना व्हॉट्सअॅप मेसेज पाठवत आपल्याला होत असलेल्या त्रासाची माहिती दिल्याचेही समोर आले आहे. 

दरम्यान या प्रकरणी प्रियाचे नातेवाईक अनिल बाळासाहेब बोर्डे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहाता पोलिसांनी पती शुभम ढगे, सासरे राजेंद्र ढगे आणि सासू प्रतिभा ढगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे राहाता तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून हुंड्यासाठी होणाऱ्या छळाच्या घटनांवर पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जात आहे.

Ashok Kharat: भोंदू खरातचं बँक लॉकर पाहून ईडीचे अधिकारीही थक्क! काय-काय सापडलं?

नाशिकमध्येही भयंकर घटना 

दुसरीकडे, सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना नाशिकच्या जेलरोड परिसरात घडली आहे. आशा प्रविण घोटेकर असं मृत महिलेचे नाव आहे. छळ करून २५ लाख रुपये आणि २१ तोळे सोने उकळल्याचा विवाहितेच्या भावाचा आरोप असून तिला नेहमी  शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच फ्लॅट आणि चारचाकीसाठी २५ लाखांची मागणी केल्याचा विवाहितेच्या भावाचा आरोप आहे. याप्रकरणी पतीसह दोघांना अटक करण्यात आली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com