Mahesh Landge Speech Ahilyanagar: अहिल्यानगरमधील पाथर्डी येथील श्री क्षेत्र मढी कानिफनाथ यात्रेवरुन नवा वाद उफाळून आला आहे. मढी यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना दुकाने न लावून देण्याची भूमिका सरपंच संजय मरकड यांच्यासह हिंदुत्त्ववादी संघटनांनी घेतली आहे. यावरुनच भूमिका मांडण्यासाठी मढी येथे सकल हिंदू समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, या मेळाव्यात बोलताना भाजप आमदार महेश लांडगे यांनी गौहत्येवरुन थेट इशारा दिला आहे.
पुरोगामी विचार संपले, सर्वधर्म समभाव संपला!
"मढी देवस्थानची दोन हजार एकर जमीन अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. त्यातील ९४ एकर वर वक्फ बोर्ड दावा सांगत आहे. अहिल्यानगर शहरांमध्ये जुने कलेक्टर ऑफिस,जुनी महापालिका यावर वक्फ बोर्ड दावा सांगत आहे. सरकारपेक्षा वक्फ बोर्डाची जागा जास्त आहे. आता पुरोगामी विचार संपलेत, सर्वधर्मसम भावही संपला आहे असं, मी प्रशासनाला सांगतो, माझ्या नावापुढे पैलवान लिहले जाते. ही कोणती डीग्री नाही, पैलवान ही पदवी देव देश धर्म यांचं संरक्षण करण्यासाठी दिली आहे," महेश लांडगे यावेळी म्हणाले.
हात धडापासून वेगळे करु..
"वक्फ बोर्डासंदर्भात जर कोणते कठोर कायदेशीर कारवाई करणार नसाल तर आम्हाला वेगळे मार्ग आहेत. ज्यांच्या दबावामुळे तुम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडेल असं वाटत असेल तर ज्या हाताने गायी कापता ते धडापासून वेगळे करु. ज्या नजरा आमच्या आया बहिणींकडे बघतात, त्यांचे डोळेच काढून टाकू. सध्या बलीदान मास सुरु आहे. आम्हाला जर मोर्चे काढावे लागत असलीत तर तुम्ही नियमबाह्य काम करत आहात," अशी टीकाही महेश लांडगे यांनी केली.
दरम्यान,"हिंदू धर्मासाठी मुसलमानाचे मतदार नको, जसं उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आहेत तसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. वक्फ बोर्ड दावा सांगत असलेल्या जमिनीवर स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी... अन्यथा विधानसभा अधिवेशनात स्थानिक प्रशासना विरोधात कारवाई करण्याची मागणी करु," असं महेश लांडगे म्हणाले.
Pune News: पुणे-लोणावळा प्रवास आता सुसाट; रेल्वेचा महत्वाकांक्षी प्रकल्प प्रवाशांचा वेळ वाचवणार