जाहिरात

Pune News: पुणे-लोणावळा प्रवास आता सुसाट; रेल्वेचा महत्वाकांक्षी प्रकल्प प्रवाशांचा वेळ वाचवणार

Pune News: रेल्वेच्या खांबांवर (Masts) हे ऑटोमेटेड टेन्शनिंग डिव्हाइसेस (ATDs) विशेष उपकरण बसवले जात आहे. यामुळे सर्व ऋतूंमध्ये ओव्हरहेड वायरवर एकसमान ताण राहण्यास मदत होईल.

Pune News: पुणे-लोणावळा प्रवास आता सुसाट; रेल्वेचा महत्वाकांक्षी प्रकल्प प्रवाशांचा वेळ वाचवणार

Pune News: पुणे-लोणावळा या अत्यंत व्यस्त रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पुणे रेल्वे विभागाने या मार्गावरील गाड्यांचा वेग सध्याच्या 110 किमी प्रतितास वरून 130 किमी प्रतितास करण्यासाठी कंबर कसली आहे. हे महत्त्वाकांक्षी काम जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे.

पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या वेग वाढीसाठी मार्गावरील ओव्हरहेड कॅटेनरी (Overhead Catenary) आणि संपर्क तारा (Contact Wires) बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

रेल्वेच्या खांबांवर (Masts) हे ऑटोमेटेड टेन्शनिंग डिव्हाइसेस (ATDs) विशेष उपकरण बसवले जात आहे. यामुळे सर्व ऋतूंमध्ये ओव्हरहेड वायरवर एकसमान ताण राहण्यास मदत होईल. ज्यामुळे तांत्रिक बिघाड कमी होतील आणि सुरक्षा वाढेल. पुणे-लोणावळा दरम्यान एकूण 152 ट्रॅक किलोमीटरचे अंतर असून त्यापैकी 132 किलोमीटरचे काम आधीच पूर्ण झाले आहे. उर्वरित अंतर जून 2026 पर्यंत पूर्ण केले जाईल. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

(नक्की वाचा-  Vasai News: कार्यालयात बोलावलं, बविआच्या कार्यकर्त्याला वळ उठेपर्यंत मारलं; भाजप नगरसेवकावर गुन्हा)

प्रवाशांना काय फायदा होणार?

130 किमी प्रतितास वेगामुळे केवळ वेळच वाचणार नाही, तर रेल्वेच्या एकूण कामकाजात स्थिरता येईल. प्रवाशांचा एकूण प्रवास वेळेत 4 ते 5 मिनिटांची घट होईल. नवीन तंत्रज्ञानामुळे हाय-स्पीडवर धावणाऱ्या गाड्यांची सुरक्षितता अधिक मजबूत होईल. पुणे-लोणावळा टप्प्यात वेग वाढल्याने पुणे-मुंबई या मुख्य मार्गावरील एकूण प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे.

(नक्की वाचा- Crime News: आईच्या कुशीतून मुलाला पळवलं, 3 लाखात विकलं, 20 तासांची शोधमोहिम अन् थेट...)

कामाचे नियोजन आणि अंमलबजावणी

रेल्वेने स्पष्ट केले की, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हे काम प्रामुख्याने रविवारी रेल्वे ब्लॉक घेऊन केले जात आहे. सध्या डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस यांसारख्या महत्त्वाच्या गाड्या या मार्गावरून धावतात, त्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com