Maharashtra Kesri 2025: महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम थरार आज पार पडत असून या स्पर्धेत मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत गादी विभागातून नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ तसेच माती विभागातून सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात लढत झाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यावेळी शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये झालेल्या लढतीनंतर हा राडा झाला. पैलवान शिवराज राक्षेने पराभवानतंर आक्षेप घेत थेट पंचाना मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. यावेळी मैदानावर मोठा गोंधळ झाला आहे. यावेळी शिवराज राक्षेने आक्रमक होत पंचाना लाथ घातली. पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप कर त्याने गोंधळ घातल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी शिवराज राक्षे याने केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशीही चर्चा केली. आपल्यावर अन्याय झाला असून पंचांनी निर्णय चुकीचा दिल्याचे त्याने म्हटले आहे. याच रागातून त्याने पंचांशी हुज्जत घातली आणि त्यांना मारहाणही केली. ज्याचे व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या गोंधळानंतर अंतिम सामने खोळंबल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आता महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध साकेत यादव यांच्यामध्ये लढत होणार आहे.
कोण आहे शिवराज राक्षे?
दरम्यान, मुळचा नांदेडचा असणारा मल्ल शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याने डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला आहे. जानेवारी 2023 मध्ये पुण्यामध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली होती. या चुरशीच्या लढतीत शिवराज राक्षेने बाजी मारत महाराष्ट्र केसरीवर पहिल्यांदा नाव कोरले होते. त्यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये त्याने पुन्हा महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली. या मोठ्या विजयानंतर शिवराज राक्षेला महाराष्ट्र सरकारने क्रिडा अधिकारी म्हणून शासकीय नोकरीही दिली होती.
नक्की वाचा - Union Budget 2025: शेतकरी ते AI.. बजेटमधून कुणाला काय मिळालं? वाचा 10 मोठ्या घोषणा