Mumbai Pollution : मुंबईत हवेच्या गुणवत्तेचा स्तर घसरला, दृश्यमानतेवरही परिणाम 

महाराष्ट्राला तापमान वाढीचा सामना करावा लागत आहे. आज हवेची गुणवत्ता ढासळल्याने दृश्यमानतेवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Mumbai Pollution : महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत असून काल 13 मार्चला सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद आहे. महाराष्ट्रासह राजस्थान आणि गुजरातमधील अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद ब्रम्हपुरी या शहरात झाली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दरम्यान आज सकाळपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मुंबईतील दृश्यमानतेवर याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता घसरली आहे. समीर या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अॅपवरील नोंदीनुसार, चकाला, अंधेरी पूर्वेकडे 191 इतका गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेला आहे. त्याशिवाय देवनारमध्ये 186, बीकेसी 105, बोरीवली पूर्व 126, भायखळा 103 इतका निर्देशांक नोंदविण्यात आला आहे. 

नक्की वाचा - Heat Wave : ऊन भारताला गरीब बनवतंय? वाढत्या उकाड्याचा खिशालाही बसतोय फटका!

महाराष्ट्रात विदर्भात 14 मार्चपर्यंत, ओडिशात 16 मार्चपर्यंत, झारखंडमध्ये 16 मार्चपर्यंत आणि पश्चिम बंगालमध्ये 18 मार्चला तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर पुढील आठवड्यात मध्यप्रदेशात देखील उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.