Ajinkya Rahane: माझा बाप शेतकरी! अजिंक्य रहाणेचा राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुढाकार, Video शेअर करत केलं हे आवाहन

Ajinkya Rahane: राज्यभरातील शेतकऱ्यांचं पावसामुळे झालेलं नुकसान पाहून टीम इंडियाचा माजी कॅप्टन अजिंक्य रहाणे हेलावला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेनं शेतकऱ्यांसाठी खास आवाहन केलं आहे.
मुंबई:

Ajinkya Rahane: राज्यात सर्वत्र सध्या पावसानं धुमाकूळ घातलाय. विशेषत: मराठवाड्यात पावसानं अक्षरश: हाहाकार माजवलंय. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं मोठी मदत जाहीर केलीय.

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करत मदत दिली जाईल असे संकेत राज्य सरकारनं दिले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांची ही अवस्था पाहून टीम इंडियाचा कॅप्टन अजिंक्य रहाणे हेलावला आहे. त्यानं इन्स्टाग्रामवर खास व्हिडिओ शेअर करत सर्वांना मदतीचं आवाहन केलंय.

काय म्हणाला अजिंक्य?

नमस्कार मी अजिंक्य रहाणे

आज मी थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहे. तो विषय आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाचा आहे. म्हणजेच शेतकरी. गेले अनेक दिवस महाराष्ट्रात तसंच महाराष्ट्राच्या अनेक भागात अतिवृष्टी झालीय.  त्या पावसामुळे शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालंय आणि होत आहे. हे आपण सर्वांनी वाचलं असेल आणि ऐकलं असेल.

मी स्वत: शेतकरी कुटुंबातील असल्यानं या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना किती त्रास होतो याची मला जाणीव आहे. वर्षानुवर्ष शेतकरी शेतात मेहनत करतो. आपल्याला जे काही आपल्या ताटात मिळतं, जेवायला मिळतं ते शेतकऱ्यांच्या कष्टामुळे मिळतं.

Advertisement

( नक्की वाचा : Maharashtra Rain: सप्टेंबरमध्येही पावसाचा कहर सुरूच! हवामान विभागाचा नवा अंदाज, 'या' तारखेपर्यंत मुसळधार पाऊस )
 

सरकार आपल्या परीनं मदत करतंय. पण, मला वाटतं की आपल्या प्रत्येकाची एक जबाबदारी आहे.आपण शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहून आपल्याला जे शक्य होईल ती मदत नक्की करावी. माझ्यापरीनं, माझ्या बाजूनं मी मदत करतोय. पण, मला प्रत्येकाला हेच सांगायचं आहे, या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आपल्याकडून जी मदत करता येईल, जो पाठिंबा देता येईल तो नक्की द्यावा. कारण, यावेळी शेतकऱ्याला आपल्या सर्वांची गरज आहे.

मी सांगितलं तसं सरकार ही मदत करतंय. पण, प्रत्येकजण शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिला तर ते चांगलं होईल. कारण शेतकरी हा आपला कणा आहे. त्याला जी मदत होईल ती द्यावी. धन्यवाद
 

Advertisement
Topics mentioned in this article