जाहिरात

Rohit Pawar: "खूप वेदनादायी", अजित पवारांसाठी रोहित पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट, व्हॉट्सअप कॉल केला अन्..

एका महिन्यानंतरही अजित पवार गेलेत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. या दुर्घटनेला एक महिना पूर्ण झाला असून आज रोहित पवार यांनी भावनिक पोस्ट केली आहे. 

Rohit Pawar: "खूप वेदनादायी", अजित पवारांसाठी रोहित पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट, व्हॉट्सअप कॉल केला अन्..

Ajit Pawar Plane Crash Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज एक महिना पूर्ण झाला. 28 जानेवारी रोजी बारामतीमध्ये लँडिग करत असताना अजित पवार यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातात अजित पवार यांच्यासह चौघांचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला होता. आज एका महिन्यानंतरही अजित पवार गेलेत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. या दुर्घटनेला एक महिना पूर्ण झाला असून आज रोहित पवार यांनी भावनिक पोस्ट केली आहे. 

रोहित पवारांचं भावुक ट्वीट

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या बातमीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी तात्काळ अजित पवार यांना फोन केला, मात्र समोरुन कॉल उचलला नाही. आपल्या ट्वीटर अकाउंटवरुन रोहित पवार यांनी भावुक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं, असं अजूनही वाटतं आणि म्हणूनच त्या काळ्या दिवशी अजितदादांच्या या नंबरवर कॉल केला. पण कॉलही उचलला गेला नाही आणि नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही, खूप वेदनादायी, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांनीही भावुक पोस्ट करत अजित पवारांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.  "आपले अजितदादा सोबत नाहीत, हे पचविणे अजूनही कठिण जात आहे. अजितदादांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही. दादा, तुम्ही कायम स्मरणात राहाल. तुमच्यासोबतच्या प्रसन्न क्षणांच्या आठवणी आयुष्यभर कायम सोबत राहतील, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

Ajit Pawar: अजित दादा गेले! महाराष्ट्र सुन्न करणाऱ्या घटनेला 1 महिना पूर्ण; 30 दिवसात काय- काय घडलं?

बारामतीकरांनी जागवल्या आठवणी

दुसरीकडे, दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज एक महिना पूर्ण झाला. या धक्क्यातून अद्याप बारामतीकर सावरलेले नाहीत. बारामतीच्या नटराज कला दालनात आज भक्ती गीतांचा कार्यक्रम घेत दादांना सार्वजनिक श्रद्धांजली ही अर्पण करण्यात आलीये. याशिवाय अजितदादांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासातील फोटोंच्या संग्रहाच्या माध्यमातून दादांच्या आठवणी जागवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com