योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Accident News Today : अकोला जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरुच आहे. आज (मंगळवार, 24 जून) झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाला. पातूर-बाळापूर रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय कॉलेज) समोर हा अपघात झाला. यामध्ये ट्रक आणि ऑटोची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये दोन जण जागीच ठार झाले, तर चार जण गंभीर जखमी झाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कसा झाला अपघात?
पातूरहून बाळापूरकडे जाणाऱ्या एका ऑटोला ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी प्रचंड होती की ऑटो पलटी होऊन प्रवासी रस्त्यावर फेकला गेला. या दुर्घटनेत ऑटोतील प्रवासी रवींद्र चतरकर (वय 13), राहणार सिंधी कॅम्प अकोला आणि लिलाबाई ढोरे (वय 50) लाखनवाडा या दोघांचा जागीत मृत्यू झाला.
( नक्की वाचा : Malegaon Sugar Factory Election Result : शरद पवारांचा अजित पवारांना टोला, 40 वर्षांचा इतिहास सांगितला )
तर सुरेंद्र चतरकर (वय 45), रविंद्र चतरकर (वय 52), रूपंचंद वाकोडे (वय 50), प्रमिलाबाई वाकोडे (वय ६५) हे गंभीर जखमी झाले.. दरम्यान स्थानिकांच्या मदतीने जखमींना पुढील उपचारासाठी अकोलामधील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.
( नक्की वाचा : BJP MLA : 'माझ्या पद्धतीने बँकेत यावं लागेल' भाजपा आमदाराची मॅनेजरला शिवीगाळ ! Audio Clip Viral )
या अपघाताचे वृत्त समजताच पातूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या दुर्घटनेचा पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे. पण, अपघात स्थळावरुन ट्रक चालक हा प्रसार झाला आहेय. या घटनेचा पुढील तपास पातूर पोलीस करत आहेत.