जाहिरात

Malegaon Sugar Factory Election Result : शरद पवारांचा अजित पवारांना टोला, 40 वर्षांचा इतिहास सांगितला

Malegaon Sugar Factory Election Result : माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीवर शरद पवारांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Malegaon Sugar Factory Election Result : शरद पवारांचा अजित पवारांना टोला, 40 वर्षांचा इतिहास सांगितला
Malegaon Sugar Factory Election Result : शरद पवारांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
मुंबई:

Malegaon Sugar Factory Election Result : पुणे जिल्ह्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 22 जून रोजी पार पडली. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख असलेल्या अजित पवारांनी (Ajit Pawar) निवडणूक प्रचारात स्वत:ला झोकून दिलं होतं. मागील पाच वर्षाच्या कालखंडात या संस्थेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मार्गदर्शना खालील संचालक मंडळ काम करत होतं. आता मात्र स्वतःच अजित पवार ब वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना तावरे गटानं कडवं आव्हान दिलं आहे. या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

शरद पवारांचा टोला

राज्य सरकारमध्ये मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींनी सहकारी संस्थांची निवडणूक लढवू नये, असं मत शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये व्यक्त केलं आहे. मी माझ्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना कधीही सहकारी  संस्थांच्या निवडणूक लढवली नाही. ⁠विरोधकांना काही अडचण आली तर सरकारी पदावरील व्यक्ती जो कारखान्याचा प्रमुख असेल तर तो विरोधकांना न्याय कसा देईल? असा प्रश्न शरद पवारांनी विचारला. शरद पवारांनी हा प्रश्न विचारत अजित पवारांना टोला लगावला असल्याचं मानलं जात आहे. 

( नक्की वाचा :  Malegaon Sugar Factory Election Result Live: माळेगाव साखर कारखाना निवडणुकीच्या सर्व निकालांचे वेगवान अपडेट वाचण्यासाठी क्लिक करा )
 

माळेगावची निवडणूक का महत्त्वाची?

माळेगाव सहकारी साखर कारखाना ही बारामतीच्या राजकारणातील महत्त्वाची संस्था आहे. तब्बल 37 गावांचं कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेचे 19,000 हून अधिक शेतकरी सभासद आहेत. मागील पाच वर्ष या कारखान्यावर अजित पवारांची सत्ता आहे. 

माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी चंद्रराव तावरे आणि माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांनी अजित पवारांसमोर कडवं आव्हान उभं केलं आहे. हे आव्हान मोडून काढण्यासाठी अजित पवार यांनी निवडणुकीपूर्वी बारामतीमध्ये ठाण मांडले होते. त्यांनी तब्बल 12 जाहीर सभा घेतल्या. 

अजित पवार विजयी

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले. श्री नीलकंठेश्वर पॅनलचे ब वर्गाचे उमेदवार अजित पवार यांना 91 तर त्यांचे प्रतिस्पर्धी सहकार बचाव शेतकरी पॅनलचे उमेदवार भालचंद्र देवकाते यांना 10 मते मिळाली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com