Akola News: अकोल्यात भीषण अपघात! भरधाव कार पुलावरुन खाली कोसळली, 3 जणांचा दुर्दैवी अंत

चारचाकी गाडी बकार्डी पुलावरून खाली पडून कारमधील तीन जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

योगेश शिरसाट, अकोला: अकोल्यामधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. अकोल्याच्या बाळापूरजवळ बाकार्डी पुलावरून कार कोसळून झालेल्या अपघातात तीन रहिवाशांचा मृत्यू झाला झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील बाळापूर जवळील बाकार्डी पुलावरून कार कोसळून झालेल्या अपघातात बाळापूरमधील तीन रहिवाशांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे. बरेगावहून बाळापूरकडे येणारी ही चारचाकी गाडी बकार्डी पुलावरून खाली पडून कारमधील तीन जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैया सिंग ठाकूर (वय 55 वर्षे) विशाल भानुदास सोलंकर (वय 45) वर्षे, सुनील शर्मा, (वय 45) वर्षे आणि आशिष कन्हैया सिंग ठाकूर, (वय 27 वर्षे) हे चारही या गाडीतून प्रवास करत होते

यादरम्यान, चारचाकी गाडी खामखेड फाट्यासमोर बाळापूरच्या दिशेने बकार्डी पुलाची सेफ्टी रेलिंग तोडून पुलावरून खाली पडली...घटना स्थळी बाळापूर पोलीस आणि बाळापूरचे स्थानिक तरुण पोहोचले आणि सर्व जखमींना बाळापूर प्राथमिक उपचार केंद्रात आणले, जिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर कन्हैया सिंग ठाकूर (वय 55) विशाल भानुदास सोलंकर (वय 45) सुनील शर्मा (वय 45) यांना मृत घोषित केले तर आशिष कन्हैया सिंग ठाकूर यांना जखमी झाल्यामुळे अकोला रुग्णालयात पाठवण्यात आलेय. या घटनेनंतर शहरात शोककळा पसरली आहे.

नक्की वाचा - Beed News : परळी वैद्यनाथाच्या मंदिर परिसरात मटण, ऑम्लेट शिजवल्याचा प्रकार; भाविकांचा संताप

दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या गारखेडा गावाजवळ पुण्याकडे जाणाऱ्या संगीतम ट्रॅव्हल्स अपघात झाला असून या अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. गारखेडा गावाजवळ रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने एकतर्फी वाहतूक सुरु असून रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रॅव्हल्स पलटी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दरम्यान जखमींना तातडीने जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Advertisement