
परळीतील श्रीक्षेत्र वैद्यनाथ मंदिर परिसरात सध्या तीर्थक्षेत्र विकासाची बांधकामे सुरू आहेत. वैद्यनाथाच्या मुख्य मंदिराच्या शेजारील विकासाधीन असलेल्या सभामंडपात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैद्यनाथाच्या पूर्व प्रवेशद्वारावरच कंत्राटदाराकडे कामाला असलेले कामगार पूर्व पायऱ्यांवरील नियोजित दर्शन मंडपातच चूल मांडून ऑम्लेट, मांसाहारी अन्न शिजवत असल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी योगेश पांडकर यांनी हा सर्व प्रकार कॅमेरात कैद केला आहे. मंदिर परिसरात कामे करतांना ऐतिहासिक, धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन कामे करावी अशा वारंवार सूचना लोकप्रतिनिधी देत असतात. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याच इमारतीच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांबाबत संबधित गुत्तेदाराला खडे बोल सुनावले होते.
नक्की वाचा - Santosh Ladda : जीवलग मित्रानेच केला घात... छत्रपती संभाजीनगरच्या दरोडा प्रकरणात नवा ट्विस्ट
आता तर वैद्यनाथ मंदिराच्या परिसरात धार्मिकदृष्ट्या निषिद्ध मानलं जाणारं मांसाहार शिजवले जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान मंदिर प्रशासनाकडून त्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे काही कार्यकर्ते यांनी तेथे जाऊन हा सर्व प्रकार मोबाइलमध्ये कैद केल्याचं दिसून येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world