
अकोला: राज्यसह देशभरात एचटीबीटी या कापूस बियाण्याचे कुठेही विक्रीसाठी परवानगी नसतांना मूर्तिजापूर शहर पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग ५३ वर एका खाजगी बस मधून इतर गाडीत बियाणाचे पोते भरत असतांना कारवाई केली. या कारवाईत 17 पोते एचटीबीटी कंपनी चे बोगस कापूस बियाणे पकडण्यात आले ज्याची किंमत लाखो रुपये असल्याचे बोलल्या जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एचटीबीटी या कापूस बियाण्यांना संशोधन संस्थेची शिफारस व शासनाची मान्यता नसल्याने या बियाण्यांच्या विक्रीस देशभरात बंदी असतांना देखील मोठ्या प्रमाणात राज्यात बोगस रित्या विक्री सुरु असून अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर व्यास हॉटेल नजिक मूर्तिजापूर शहर पोलीसांचे पथक गस्तीवर असतांना गुजरातच्या सुरत येथून अमरावती च्या दिशेने जाणाऱ्या एका खाजगी बस (लगझरी) मधून एका वॅगनॉर कंपनी च्या कार मध्ये काही व्यक्ती ध्यान्याचे पोते संशयस्पद भरतांना दिसल्याने पोलिसांनी केलेल्या तपासणीत मोठ्या प्रमाणात बियाणे असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी सदर बाब ही तालुका कृषी अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क करून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले व या मध्ये सदर पोत्यातील बियाणे हे देशभरात बंदी असलेल्या कापूस च्या एचटीबीटी कंपनीचे 17 पोते आढळून आले. ज्याची किंमत बाजारपेठ मध्ये 15 ते 20 लाख असल्याचे तालुका कृषी अधिकारी यांनी स्पष्ट केले.
( नक्की वाचा : Honey Trap : 'ती'ने फेसबुकवर अंगप्रदर्शन केले, 'त्याने' पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवली! ठाण्याचा रवी असा सापडला जाळ्यात )
मात्र या सर्व घटनेत पोलिसांची भूमिका संशयास्पद असून या कारवाई पोलिसांनी केवळ एका आरोपीस अटक करून केवळ एक टाटा कंपनीची एम. एच. 20 ए. टी जप्ती मध्ये दाखवण्यात आली 8048 असून मूळ काळ्या रंगाची जी वॅगनार कार वापरण्यात आली ती मात्र पोलिसांनी सोडून दिलीये. तर प्रत्यक्षदर्शी सदर कार चालक हा माध्यमांच्या समोर सर्व हकीकत मांडत असताना मात्र मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक यांनी मज्जा केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world