Akola Election: अकोला महापालिकेवर कुणाचा झेंडा? सत्तेसाठी राजकारण रंगलं; पडद्यामागे मोठ्या घडामोडी

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच गोड बातमी देणार असल्याचं वक्तव्य साजिद खान पठाण यांनी केलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

योगेश शिरसाट, अकोला:

Akola Municiple Corporation Election: अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप आणि काँग्रेसकडून सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू असून शहरात ‘हाय व्होल्टेज पॉलिटिक्स' पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच गोड बातमी देणार असल्याचं वक्तव्य साजिद खान पठाण यांनी केलं आहे.

अकोला महापालिकेवर कोणाची सत्ता?

अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या 41 नगरसेवकांच्या संख्याबळासाठी विविध पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी काँग्रेस, एमआयएमचे पदाधिकारी,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेविकेचे पती तसेच माजी गृहमंत्री रणजीत पाटील यांचे पुतणे आशिष पवित्रकार उपस्थित होते. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून आज सत्ता स्थापनेबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असं काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी सांगितलं आहे.

Bhiwandi Mayor: भिवंडी महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग! आकडे काँग्रेसच्या बाजूने पण भाजपचा...

या सगळ्या घडामोडींमध्ये विशेष बाब म्हणजे अकोला महापालिकेची निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एकत्र लढवली होती. राष्ट्रवादीच्या एका महिला उमेदवाराचा विजय झाला असतानाच, त्यांचे पती काँग्रेससोबत प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला उपस्थित होते. मात्र आपण केवळ लग्नाची पत्रिका देण्यासाठी आलो होतो, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

वंचितच्या भूमिकेकडे लक्ष..

तसेच माजी गृहमंत्री रणजीत पाटील यांचे पुतणे ,अपक्ष उमेदवार आशिष पवित्रकार यांनीही प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली असून आपल्याला मोठ्या पदाची ऑफर देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली असून भेटीसाठी आलेल्या सर्व पक्षांनी आधी एकत्रित संख्याबळ दाखवावं, त्यानंतरच आम्ही निर्णय जाहीर करू, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Advertisement

आज सकाळी 11 वाजेपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला असून त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं ते म्हणाले. अकोला महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचाली निर्णायक टप्प्यावर पोहोचल्या असून काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. मात्र पाच नगरसेवकांची संख्याबळ असलेली वंचित बहुजन आघाडी नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण अकोल्याचं लक्ष लागले आहे.

नक्की वाचा - जिल्हा परिषद, पंचायत समितींसाठी उमेदवारी अर्जांचा महापूर, सर्वाधिक अर्ज कोणत्या जिल्ह्यात? पाहा संपूर्ण यादी