Akola Onion: कांदा उत्पादकांवर नवे संकट! 4 महिने झाले पण वाढ होईना; शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

याच आशेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता अक्षरश: पाणी आलंये.. अखेर शेतकऱ्यांचा संयमचा बांध फुटला अन कठोर भूमिका घेतली. 

जाहिरात
Read Time: 2 mins

अकोला: अकोल्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट उभं ठाकले आहे. चार महिने उलटले, तरीही कांदा पिकाची वाढ होईना.. यामुळ तेल्हारा तालुक्यातला कांदा उत्पादक शेतकरी मोठा चिंतेत आला आहे. याच नैराश्यामधून अनेक शेतकऱ्यांनी कठोर भूमिका घेतली अन थेट कांद्याच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला. एकंदरीत सध्या शेतकऱ्यांना कांदा लागवडीचा खर्चही निघणं कठीण झाले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कारण, चार महिने उलटले खरी, मात्र अजूनही शेतातला कांदा तयार नाही. तसेच काहींच्या कांद्याला पाल सुद्धा फुटली नसल्याचं वास्तव आहे.  काहींचं कांदा पिक पूर्णतः जळाले आहे. मात्र एवढ्या कष्टाने पिकवलेल्या पिकाला चार महिने उलटले, तरीही कांदा पिक तयार होईल, याच आशेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता अक्षरश: पाणी आलंये.. अखेर शेतकऱ्यांचा संयमचा बांध फुटला अन कठोर भूमिका घेतली. 

दरम्यान  तेल्हारा तालुक्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांचे कांद्याचे पीक धोक्यात आहे. वातावरणाच्या लहरीपणामुळे कांदा पिकांची वाढ थांबली असल्याचे बोलल्या जातंये.. नोव्हेंबर महिन्यात कांदा पिकाची लागवड झाली, पिकात वाढ होत नसल्यानं शेतकऱ्यांनी कांदा पिकावर अनेकदा औषधे फवारणी केल्या.

(नक्की वाचा- HDFC आणि पंजाब अँड सिंध बँकेला रिझर्व्ह बँकेचा दणका, ग्राहकांवर काय परिणाम होणार?)

परंतु, फरक जाणवलाच नाही. दानापूर आणि हिंगणी गावात कांदा पिकाच 100 टक्के नुकसान झाले आहे.. याच नैराश्यामधून इथला शेतकरी कांदा पिक शेतातून उखडून फेकलं आहे, तर काही जण उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवत आहेत. 

Advertisement

दरम्यान, धुळे जिल्ह्यात  विविध भागात कांदा काढणी सुरू असून यात येत्या काळात उन्हाळी कांदा बाजारात येणार आहे. परंतु उन्हाळी कांदा बाजारात येत असतानाच दरांमध्ये मोठी घसरण सुरू झाली आहे. यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. आधीच लागवड आणि संगोपन खर्च वाढला असताना त्यात आता दर घसरत असल्याने शेतकरी बेजार झाले आहेत. उन्हाळी कांद्याची बाजारात आवक वाढल्याने दरात मोठा उतार आला आहे. दीड हजार रुपये क्विंटलपर्यंत दर घसरला आहे.

Topics mentioned in this article