
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि पंजाब अँड सिंध बँकेला (Punjab & Sind Bank) दंड ठोठवला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेला 75 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, बँकेने नो युवर कस्टमर (केवायसी) नियमांचे योग्यरित्या पालन केले नाही, ज्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याशिवाय, बँकेने काही ग्राहकांना एकच युनिक कस्टमर आयडेंटिफिकेशन कोड देण्याऐवजी अनेक ग्राहक आयडी (UCIC) जारी केले होते. जे आरबीआयच्या नियमांविरुद्ध आहे. बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आरबीआयने हा दंड ठोठावला आहे. बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
(नक्की वाचा- Mumbai News : ऐश्वर्या राय बच्चनच्या लक्झरी कारला बेस्ट बसची धडक; पाहा VIDEO)
पंजाब अँड सिंध बँकेलाही दंड
रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड सिंध बँकेला 68.20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 'सेंट्रल रिपॉझिटरी ऑफ लार्ज कॉमन एक्सपोजर्स' आणि 'फायनान्शियल इन्क्लुजन - बँकिंग सर्व्हिसेस' या मार्गदर्शक तत्त्वांचे बँकेने पालन न केल्याचे रिझर्व्ह बँकेला आढळून आले आहे.
(नक्की वाचा - Mumbai Local : मध्य रेल्वेवर प्रवाशांना दररोज 10,000 तर आठवड्याला 50,000 रुपये जिंकण्याची संधी, CR चा धमाकेदार उपक्रम)
बँकांनी नियमांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. याचा अर्थ असा नाही की बँका आणि त्यांच्या ग्राहकांमधील कोणत्याही व्यवहारांवर परिणाम होणार नाही. रिझर्व्ह बँकेची ही बँकांना एक कडक इशारा आहे की, त्यांनी नियमांचे पूर्णपणे पालन करावे, अन्यथा त्यांना मोठा दंड होऊ शकतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world