योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासल्याची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. त्याचवेळी अकोलामध्ये संभाजी ब्रिगेड पक्षाच्या माजी प्रदेश कार्याध्यक्षाला एका महिलेने चांगलाच चोप देतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. महिलेची छड काढल्याच्या आरोपावरून त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातल्या मुर्तीजापूर तालुक्यात हा सर्व प्रकार घडलाय. दरम्यान या प्रकरणात संघटनेची प्रतिष्ठा पणाला लागल्यानं या बड्या नेत्याला कायमस्वरुपी बडतर्फ करण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण?
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरात ही धक्कादायक घटना घडली आहे. संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. गजानन पारधी असं बडतर्फ करणाऱ्यात आलेल्या या बड्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. त्यानं फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडं पैशांची मागणी केली होती. तसंच आपली छेडछाड केल्याचा आरोपही पीडित महिलेनं केला आहे.
( नक्की वाचा : Delhi Murder: 'मला संतुष्ट करु शकत नव्हता', पतीच्या हत्येची पत्नीनं दिली कबुली, सर्च हिस्ट्रीमुळे उघड झालं भयंकर रहस्य )
पारधीच्या त्रासाला कंटाळलेल्या महिलेनं त्याला चपलेनं चांगलाच चोप दिला. हा सर्व प्रकार मुर्तीजापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्येच घडला आहे. वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असलेला डॉ. पारधीची पक्षातून कायमची हकालपट्टी करण्यात आली आहे.
डॉ.गजानन पारधी यांनी पक्षविरोधी कारवाई करून गैरवर्तणूक करून पक्ष संघटनेच्या प्रतिमेला डाग लावल्यामुळे त्याला कायमच बडतर्फ केलं.. याबाबत पक्षाने एका महिन्यापूर्वी प्रसिद्धी पत्राद्वारे पारधी यांची पक्षातून हकालपट्टी केली असल्याची माहिती समोर आली आहे. सामाजिक संघटनेतून हकालपट्टी केल्यानंतर पीडित महिलेकडून चप्पलचा चोप देण्यात आला. मात्र याबाबतचा कोणताही गुन्हा अद्याप मुर्तीजापुरसह जिल्हाभरात कुठे दाखल करण्यात आलेला नाही.