योगेश शिरसाट
शासकीय रुग्णालय म्हटलं म्हणजे सततची वरदळ ही आलीच. इथं लोकांची रुग्णांनी नेहमी ये जा असते. त्यामुळे अशा ठिकाणी जर काही चुकीच्या गोष्टी होत असतील तर ती धक्कादायक बाब आहे. अकोल्याच्या शासकीय रुग्णालयातून अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथं रुग्ण उपचारासाठी येत असतात. पण त्याच वेळी त्यांना या परिसरात अश्लील चाळे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. दिवसाढवळ्या ही कृत्य सुरू असल्यामुळे इथं येणाऱ्यांना नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय संबंधीतांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी ही केली आहे.
नक्की वाचा - Ladki Bahin Yojana: E- KYC, OTP ची चिंता मिटणार, पण 'या' लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार
अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण या रुग्णालयात येतात. मात्र याच परिसरात अश्लील चाळे सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालय आवारात असलेल्या लॉनवर हे सर्व सुरु असल्याचं दिसून आले आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांसोबत गंभीर प्रकार झाल्याचं ही निदर्शनास आले आहे. शासकीय रुग्णालयातील समता लॉनमधील अश्लील चाळे करतांनाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओ मुळे एकच खळबळ उडाली आहे. शासकीय रुग्णालय म्हटले म्हणजे या ठिकाणी दिवसभरात शेकडो रुग्ण व त्यांचे नातेवाईक येत असतात. रुग्णा सोबत असलेले नातेवाईक अनेक वेळा याच लॉनवर दिसतात. पण तिथे काही प्रवृत्ती ह्या अश्लील चाळे करत असल्याचं समोर आलं आहे. त्याचा व्हिडीओ इथल्याच एका नातेवाईकांनी शुट केला आहे. त्यानंतर तो व्हायरल ही झाला आहे. अशा वेळी रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था काय करत असते असा प्रश्न निर्माण झाला आहे. यांना रोखणारं कोणी आहे की नाही अशी ही विचारणा नागरिक करत आहेत.