Akola News : मामा-भाची एकत्र आले अन् थेट रेल्वे रुळावर घेतली उडी; पोलिसांच्या तपासात धक्कादायक कारण समोर

अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मामा आणि भाचीने विषारी औषध घेऊन रेल्वे रुळावर उडी घेतल्याची माहिती मिळाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Akola News : अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मामा आणि भाचीने विषारी औषध घेऊन रेल्वे रुळावर उडी घेतल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, महेंद्र पवार आणि पूजा कासारे (नावं बदलली आहेत) अशी या दोघांची नावे असून त्यांना वेळेत मदत मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूजा कासारे यांच्या पतीकडून मामा आणि भाचीच्या नात्यावर संशय घेतला जात असल्याची चर्चा होती. या संशयामुळे दोघेही मानसिक तणावाखाली असल्याचं सांगितलं जात आहे. या सततच्या संशयाला आणि कौटुंबिक तणावाला कंटाळून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या घटनेमागील नेमकं कारण काय आहे, याचा तपास अद्याप सुरू असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे.

108 रुग्णवाहिकेची तत्परता; दोघांचे प्राण वाचले

घटनेची माहिती मिळताच अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयाशी संलग्न असलेल्या 108 रुग्णवाहिका सेवेला तात्काळ पाचारण करण्यात आले. रुग्णवाहिकेचे चालक मुकेश ढोके यांनी विलंब न करता रुग्णवाहिकेच्या डॉक्टरांसह घटनास्थळ गाठले. रेल्वे रुळावरून बाजूला केलेल्या दोघांनाही बाहेर काढण्यात आलं आणि प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या देखरेखीखाली दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आपत्कालीन परिस्थितीत 108 रुग्णवाहिका सेवेने दाखविलेल्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या घटनेत वेळेवर मिळालेली मदत निर्णायक ठरल्याचेही बोलले जात आहे.

Advertisement

नक्की वाचा - 20 जणांचं एकत्र कुटुंब, पार्टीची परवानगी नाही; त्यात सिया दारूच्या..., केतनच्या आईचा धक्कादायक खुलासा

रेल्वे पोलिसांचा तपास सुरू; नेमके कारण शोधण्याचे आव्हान

घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस तसेच जीआरपीचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्राथमिक माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. दोघांनी हे पाऊल नेमक्या कोणत्या परिस्थितीत उचलले, त्यामागे कौटुंबिक वाद, मानसिक तणाव किंवा इतर काही कारण होते का, याचा तपास केला जात आहे. संबंधित नातेवाईक, कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांची चौकशीही सुरू असल्याचे समजते. या घटनेमुळे समाजात संशय, कौटुंबिक तणाव आणि मानसिक दबाव यांसारख्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर येईल. सध्या दोघांवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक बारकाईने लक्ष ठेवून आहे. दरम्यान, या घटनेने अकोला जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Topics mentioned in this article