Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाचं! अक्षय्य तृतीयनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune city traffic Changes: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला होणारी भाविकांची गर्दी पाहून त्या भागातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. काय आहेत रस्ते वाहतूकीमधील बदल?

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हिंदू धर्मातील महत्त्वाचा दिवस म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य तृतीयेनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत महत्वाचे बदल करण्यात आले असून शहराच्या मध्यभागी PMPL बससह दुचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच शहरातील मध्यभागी असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला होणारी भाविकांची गर्दी पाहून त्या भागातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. काय आहेत रस्ते वाहतूकीमधील बदल? वाचा सविस्तर..

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

असे असतील वाहतूकीमधील बदल...

  •  छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, गणेश रस्ता, तसेच लक्ष्मी रस्ता परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहे. या भागातील पीएमपी बस सेवा पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
  • बुधवारी सकाळी सात ते रात्री बारा या वेळेत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.
  •  छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौकातून (माॅडर्न कॅफे हाॅटेल) स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, खंडोजीबाबा चौक, टिळक चौकमार्गे पुढे जाणे..
  • स. गो. बर्वे चौकातून महापालिकेकडे जाणाऱ्या वाहनांनी जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक, काँग्रेस भवन या मार्गाने महापालिका भवन येथे जावे..
  • दारुवाला पुलाकडून फडके हौदमार्गे जाणारी पीएमपी बस सेवा पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे..

ट्रेंडिंग बातमी - काहीतरी मोठे घडणार ? CDS आणि NSA ची पंतप्रधानांसोबत बैठक