Amit Shah News: वीर सावरकर जयंतीनिमित्त अमित शाहंचे मुंबईत व्याख्यान; असा असेल महाराष्ट्र दौरा!

जाहिरात
Read Time: 2 mins

नागपूर: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. रविवारी रात्री उशिरा ते नागपूरमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी  भाजपच्या निवडक महत्त्वाच्या नेत्यांशी बंद दाराआड चर्चा केल्याची माहिती आहे .आज त्यांचा नागपूर आणि नांदेड येथे कार्यक्रम आहे.

(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कसा असेल अमित  शहांचा दौरा?

सोमवार 26 मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथील प्रस्तावित निवासाचे त्याचप्रमाणे चिचोली येथील नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसचे भूमिपूजन पार पडणार आहे. तसेच  नांदेडमध्ये ते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील आणि औद्योगिक क्षेत्रातील एका उद्यानात सुविधांचे उद्घाटन करतील. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.

त्यानंतर मंगळवारी मुंबई विद्यापीठातील सर कावासजी जहांगीर हॉलमध्ये ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 60 व्या पुण्यतिथीनिमित्त प्रमुख भाषण करतील. मुंबईमध्ये शाह माधवबाग मतदारसंघातील लक्ष्मी-नारायण मंदिराच्या 150 व्या उत्सवालाही उपस्थित राहणार आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करत असताना, हा त्यांचा पहिलाच राज्य दौरा आहे.

नक्की वाचा - Vande Bharat Express : नागपूर ते पुणे आणि मुंबई मार्गावरही धावणार वंदे भारत एक्स्प्रेस, कधीपासून होणार सुरू?

या महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्. संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम तयार करून चार आठवड्यांत न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने निवडणुकीची तयारी सुरु केली असून अमित शहा यांचा हा दौरा त्यादृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. 

Advertisement