Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमानात स्फोटके होती का? अमोल मिटकरींचा सवाल

Amol Mitkari on Ajit Pawar Plane crash: अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

योगेश शिरसाट, अकोला 

Ajit Pawar Plane Crash Update: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणावरून आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. या घटनेला 17 दिवस उलटूनही सत्य समोर न आल्याने मिटकरी यांनी थेट केंद्र सरकारकडे धाव घेण्याचे संकेत दिले आहेत.

अजित पवारांचा विमान अपघात निव्वळ अपघात नसून घातपात असण्याची शक्यता असल्याचं विधान अमोल मिटकरी यांनी केलं. अजितदादांच्या विमान अपघाताचं मोठं गुढ अद्यापही महाराष्ट्रासमोर आहे. विमान अपघाताला इतके दिवस उलटूनही अद्याप 'ब्लॅक बॉक्स'चा डेटा का जाहीर झाला नाही?" असा सवाल करत त्यांनी या प्रकरणाच्या पारदर्शक तपासाची मागणी लावून धरली आहे.

(नक्की वाचा-  Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमान अपघाताचं गुढ उकलणार? रोहित पवार मोठा निर्णय घेणार? दिल्लीत हालचाली)

अमोल मिटकरींनी उपस्थित केलेले महत्त्वाचे मुद्दे

  • विमान जळून बेचिराख झाल्यानंतरही विमानात स्फोट झाले. तसा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे विमानात आधीच काही स्फोटके पेरली होती का? याची तांत्रिक तपासणी होणे आवश्यक आहे.
  • घटनेनंतरचे सीसीटीव्ही फुटेज अद्याप का लपवले जात आहेत? विमान बेचिराख झाल्यानंतर जो नवीन व्हिडिओ समोर आला आहे, त्याने संशय अधिक बळावला आहे.
  • वैमानिक मदन शाही आणि यश यांच्याबद्दलची सर्व माहिती सरकारने सार्वजनिक करावी.
  • 17 दिवस झाले तरी ब्लॅक बॉक्समधील डेटा आणि संभाषणाची माहिती समोर का आली नाही?
  • मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्यानंतर आता अमोल मिटकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांना मेल करून चौकशीची मागणी करणार आहेत.

(नक्की वाचा-  Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)

"पुरावे द्या, अन्यथा चौकशी करा"

अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले की, समाजात दोन प्रवाह आहेत. एक गट याला अपघात मानतो, तर दुसरा मोठा गट हा घातपात असल्याचे मानतो. "जर घातपाताचा संशय चुकीचा असेल, तर सरकारने अधिकृत पुरावे सादर करून जनतेचा संभ्रम दूर करावा," अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे. 

पाहा VIDEO