Amravati News: प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याची पैज, वाद अन् जिवलग मित्रानेच केला गेम; अमरावती प्रकरण कसं समोर आलं?

शर्यतीमधूनच हे अश्लील प्रकरण सुरु झाले. आरोपी अयान अहमद हा मुलींसोबत केलेल्या अश्लील कृत्याचे व्हिडिओ बनवून उझेर खानला पाठवत होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

शुभम बायस्कार, अमरावती:

Amravati Ayan Ahmed Case:  अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याचं लैंगिक शोषण तसेच अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी अयान अहमद या नराधमाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता एक सर्वात खळबळजनक खुलासा झाला असून मित्रासोबत लागलेल्या पैजेमुळे या संपुर्ण स्कँडलचा पर्दाफाश झाल्याचं समोर आले आहे. 

EXCLUSIVE: अश्लील भाषा, साडी- टिकलीची खिल्ली अन् धर्मावरुन चेष्टा, नाशिकच्या TCSमध्ये काय काय सुरु होतं?

प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याची पैज, पैशांचा वाद अन् पर्दाफाश! 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणांमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी  अयान अहमद आणि उझेर खान यांच्यामध्ये कोण सर्वात जास्त मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतं पाहू अशी शर्यत लागली होती. या शर्यतीमधूनच हे अश्लील प्रकरण सुरु झाले. आरोपी अयान अहमद हा मुलींसोबत केलेल्या अश्लील कृत्याचे व्हिडिओ बनवून उझेर खानला पाठवत होता.

Advertisement

मात्र काही दिवसांनी या दोन मित्रांमध्ये पैशावरून वाद झाला.  याच पैशाच्या वादातूनच रागाच्या भरात उझेर खान याने अयान अहमदचे सर्व अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्यास सुरुवात केली. तिथूनच हे परतवाडा मधील तरुणींचे लैंगिक शोषणाचं प्रकरण समोर आले. या प्रकरणातील दोन मख्य आरोपीअयान अहमद आणी उझैर खान यांच्या आपापसातील वादामूळेच अखेर या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला.

पोलिसांकडून तपास सुरु

या प्रकरणात वापरल्याचा संशय असलेला अमरावतीतील एक फ्लॅट पोलिसांनी सील केला आहे. या ठिकाणी अत्याचार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच अनैतिक मानवी तस्करीसंदर्भातील कलमांचाही विचार सुरू आहे. आरोपी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सक्रिय होता आणि त्याने अनेक मुलींशी संपर्क साधला असण्याची शक्यता आहे. 

दरम्यान,  या प्रकरणातील एकूण पीडितांची संख्या १२ पेक्षा जास्त नसावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा सखोल आणि पारदर्शक तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली असून, पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Job Story: ऑफिस आहे की जेल? कंपनीचे कडक नियम, तरुणाने 17 लाखाची नोकरी सोडली, VIDEO व्हायरल

Topics mentioned in this article