Amravati News: अमरावती अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट! 5 पोलीस कर्मचाऱ्यांना दणका, एसपींचा मोठा निर्णय

सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने मुख्यालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ​परतवाडा येथील या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

शुभम बायस्कार, अमरावती:

Amravati Scandel:  अमरावतीच्या परतवाडा येथील गाजलेल्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे व्हावा, यासाठी अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी कठोर पाऊल उचलले आहे. या प्रकरणातील 'एसआयटी' (SIT) तपासात स्थानिक पोलिसांकडून कोणताही हस्तक्षेप किंवा प्रभाव पडू नये, या उद्देशाने एका साहाय्यक पोलीस निरीक्षकासह पाच कर्मचाऱ्यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी करण्यात आली आहे.

CM Devendra Fadnavis: जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; राज्यातील सद्यस्थिती काय? A To Z माहिती वाचा

अमरावती अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट

​या कारवाईत साहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सलीम शेख, हेड कॉन्स्टेबल अब्दुल नाझीम अब्दुल कलाम, मोहन वावरे, पुरुषोत्तम बावनेर, पोलीस शिपाई शुभम वर्मा आणि मयूर गुरव यांचा समावेश आहे. या  सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने मुख्यालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ​परतवाडा येथील या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

Advertisement

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पोलीस ठाण्यातील काही अधिकारी आणि कर्मचारी या तपासावर परिणाम करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. विशेषतः हेड कॉन्स्टेबल अब्दुल नाझीम यांच्या भूमिकेवर लोकप्रतिनिधींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भाजप नेते अनिल बोंडे यांनी नाझीम यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर, तपासाची पारदर्शकता जपण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

5 पोलिसांची उचलबांगडी

दरम्यान, याप्रकरणावरुन बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.  बटेंगे तो कटेंगे म्हणणारे गेले कुठे?  तुमच्याच राज्यात अन्याय होत आहे, आणि तुम्ही बोंबलत आहात फडणवीस साहेब काय करत आहेत? असा सवाल करत आरोपीला पायदळी तुडवलं पाहिजे, त्याचा चौरंग केला पाहिजे, पंधरा दिवसात कारवाई झाली नाही तर आंदोलन करू, असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे. 

Yavatmal News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी गावी आला; मिरवणुकीत 16 वर्षांचा हरी रक्ताच्या थारोळ्यात...