जाहिरात

Yavatmal News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी गावी आला; मिरवणुकीत 16 वर्षांचा हरी रक्ताच्या थारोळ्यात...

अवघा १५ वर्षांचा हरीश्वर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी गावी आला होता. मिरवणुकीत तो आनंदाने नाचत होता. त्यादरम्यान असं काही घडलं की सर्वच संपलं.

Yavatmal News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी गावी आला; मिरवणुकीत 16 वर्षांचा हरी रक्ताच्या थारोळ्यात...
AI Image

Yavatmal News : १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी झाली. अनेक ठिकाणी शांततेत मिरवणुका निघाल्या. दरम्यान यवतमाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आनंदोत्सवात हिरहिरीने सहभाग नोंदविणाऱ्या एका 15 ते 16 वर्षीय बालकाची हत्या झाली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

नाचताना धक्का लागला अन् थेट हत्या...

ही घटना यवतमाळमधील नेर तालुक्यातील विरगव्हाण येथे घडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मिरवणुकीत भीम अनुयायी आनंदाने नाचत होते. यावेळी नाचताना एका १५ ते १६ वर्षांच्या बालकाची समवयस्क बालकाला धक्का बसला. क्षुल्लक कारणामुळे समोरील मुलाचा संताप झाला. त्याने त्या १५ वर्षांच्या मुलाला जबर मारहाण केली. तो इथवर थांबला नाबी तर त्याने चाकूने वार करीत मुलाची हत्या केली. 

नक्की वाचा - Why Blue Color:आंबेडकरवादी निळ्या रंगाचा सर्वाधिक वापर का करतात? दलितांचा संघर्ष अन् निळ्या रंगाशी संबंध काय? 

अल्पवयीन मुलाने संतापाच्या भरात जीवच घेतला...

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील विरगव्हाण येथील 15 वर्षांचा लकी हरीश्चंद्र ढोले हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी गावी पाहुणा म्हणून आला होता. त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. दरवर्षीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदरम्यान गावात उत्साहाचं वातावरण होतं. सायंकाळी मिरवणुकीची तयारी झाली. सर्वत्र आनंदोत्सव सुरू होता. रात्री लकी सुद्धा आनंदोत्सवात सहभागी झाला. रॅलीत नाचतांना एका अल्पवयीन बालकाला त्याचा धक्का लागला. दोघांत वाद झाला. या वादाचे रुपांत हाणामारीत झाले. संतापाच्या भरात अल्पवयीन बालकाने थेट चाकू काढला आणि लकीवर काही कळण्याच्या आत वार केला. लकी जागीच रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. नागरिकांच्या लक्षात येताच त्याला रुग्णालयात नेत असतांना वाटेतच त्याची प्राणज्योत मावळली. हल्लेखोर अल्पवयीन बालक देखील काही वेळातच ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी तत्काळ तपासचक्र फिरवित मारेकऱ्याला ताब्यात घेतलं. मारेकरी अल्पवयीन असल्याने त्याला बालगृह न्यायालयात हजर करण्यात आले. आता तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com