शुभम बायस्कार, अमरावती:
Amravati Vidhan Parishad Election Result 2026: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी ३९० मताधिक्य मिळवत एकतर्फी आणि ऐतिहासिक विजय मिळविला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि विशेषतः काँग्रेसचा संपूर्ण 'सुपडा साफ' झाला असून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजीत देशमुख यांना चक्क 'शून्य' (०) मते मिळाली आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांना ३१ मते मिळाली. या दणदणीत विजयानंतर आमदार प्रवीण पोटे यांनी 'NDTV मराठी'शी बोलताना खळबळजनक राजकीय गौप्यस्फोट केला असून, विरोधकांच्या गोटात तीव्र अस्वस्थता निर्माण केली आहे.
'वंचित'ला मिळालेल्या ३१ मतांची गंभीर दखल; पोटे म्हणाले, "कुंडली माझ्याकडे
निकालानंतर 'NDTV मराठी'शी विशेष संवाद साधताना आमदार प्रवीण पोटे यांनी निवडणुकीतील अंतर्गत गणितांवर थेट भाष्य केले. वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या ३१ मतांचा संदर्भ देत ते त्यांनी सूचक भाष्य केलं. पोटे म्हणाले, "काँग्रेस आणि महाविकास आघाडीची फुटलेली मते वंचितकडे कशी आणि कोणामुळे गेली, याची खडानखडा आणि संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे. हे मतदान कोणी आणि का केले, याची कुंडलीच माझ्याकडे तयार आहे; मात्र ती माहिती मी आताच उघड करणार नाही." पोटेंच्या या थेट विधानामुळे काँग्रेसमधील अंतर्गत बंडखोर आणि क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
"हर्षजीत देशमुखांनी माघार घेतली नव्हती, नेत्यांनीच बळजबरीने बसवले
काँग्रेसच्या पराभवावर आणि हर्षजीत देशमुख यांना मिळालेल्या 'शून्य' मतांवर बोलताना प्रवीण पोटेंनी काँग्रेस नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. "काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी स्वतःहून या निवडणुकीतून माघार घेतली नव्हती, तर काँग्रेसच्याच बड्या नेत्यांनी कटकारस्थान करून त्यांना जबरदस्तीने निवडणुकीच्या रिंगणातून मागे खेचले आणि त्यांना घरबसल्या l पराभवाच्या खाईत लोटले," असा घणाघाती आरोप पोटेंनी केला.
आपल्या या वादळी यशाचे संपूर्ण श्रेय त्यांनी शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व निष्ठावान नगरसेवक, भाजपा महायुती कार्यकर्त्यांना दिले आहे. तसेच, "अमरावती जिल्ह्यात गेल्या ५ वर्षांत २५ हजार कोटींची ऐतिहासिक विकासकामे झाली आहेत, हा विकासकामांचा झंझावात येणाऱ्या काळात अधिक वेगाने पुढे सुरू ठेवणार," असा ठाम विश्वासही l प्रवीण पोटे यांनी यावेळी व्यक्त केला.
(नक्की वाचा- Nashik MLC Election: नाशकात सर्वात मोठा उलटफेर! गोकुळ गितेंचा 'गनिमी कावा'; नरेंद्र दराडेंचा पराभव करत विजयी)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world