59 minutes ago

Maharashtra Ganpati Visrajan lalbaugcha raja visarjan Miravnuk LIVE Update: दहा दिवसाच्या पाहुणचारानंतर आज लाडका गणराया निरोप घेणार आहे. राज्यभरात गणपती विसर्जन मिरवणुकांची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुंबईसह पुण्यामध्ये मोठ्या विसर्जन मिरवणुका निघणार असून बाप्पाचे विसर्जन सुरळीत होण्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. पुण्यामध्ये मानाच्या गणपतींचा विसर्जन मिरवणुका १० वाजल्यानंतर निघणार आहेत. 

Sep 06, 2025 19:44 (IST)

Ganpati Visarjan 2025 LIVE Update : 'मुंबईचा राजा' गिरगाव चौपाटीवर दाखल, अलोट गर्दीत बाप्पाला निरोप

Ganpati Visarjan 2025 LIVE Update :  'मुंबईचा राजा' गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे. अलोट गर्दीत या बाप्पाला निरोप दिला जात आहे. 

Sep 06, 2025 19:24 (IST)

Ganpati Visarjan 2025 LIVE Update : लालबागच्या राजाच्या दर्शनाला अलोट गर्दी

चिंचपोकळी येथे लालबागच्या राजाचे आगमन झाले आहे. राजाला पाहण्यासाठी लोकांचा अक्षरश: महापूर लोटला आहे. 

Sep 06, 2025 15:43 (IST)

Ganpati Visarjan 2025 LIVE Update :: 'मुंबईच्या राजा'वर पुष्पवृष्टी, 'लालबागचा राजा' विसर्जनासाठी मार्गस्थ

लालबागच्या गणेश गल्लीतील बाप्पाची मुंबईचा राजा अशी ओळख आहे. या मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणुक हजारो गणेशभक्तांच्या उत्साहात सुरु झालीय. मुंबईच्या राजावर दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रॉफ बिल्डिंगवरुन पुष्पवृष्टी करण्यात आली.  

लालबागच्या राजाची मिरवणूकही विसर्जनासाठी मार्गस्थ झाली आहे. 

Sep 06, 2025 13:38 (IST)

Live Update : मानाचा पहिला कसबा गणपती अल्का टॉकीज चौकात दाखल

मानाचा पहिला कसबा गणपती अल्का टॉकीज चौकात दाखल

सकाळी ९ वाजून ३६ मिनिटांनी कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला झाली होती सुरुवात

कसबा गणपती अल्का टॉकीज चौकातून विसर्जनासाठी मार्गस्थ

प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेच्या एक तास आधी कसबा गणपती अलका टॉकीज चौकात

Advertisement
Sep 06, 2025 13:36 (IST)

Live Update : मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या धमकीनंतर मुंबई पोलीस सतर्क

मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या धमकीनंतर मुंबई पोलीस सतर्क

मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकाकडून पर्यटन स्थळावरील ठिकाणी पाहणी

जुहू चौपाटी वरील महापालिकेचे स्वागत कक्ष आणि पोलीस दलाचे स्वागत कक्ष या ठिकाणी बॉम्बशोधक पदकाकडून तपासणी 

काही संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना कळवण्याचे पोलिसांकडून नागरिकांना आवाहन

Sep 06, 2025 13:26 (IST)

Ganpati Visarjan 2025 : लालबाग मंडळाकडून ऑपरेशन सिंदूरला मानवंदना

लालबाग मंडळाकडून ऑपरेशन सिंदूरला मानवंदना 

तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक घरातून एक व्यक्ती सैन्यात असावे असे आवाहन केले.

गणपती मुख्य प्रवेशद्वारावर आल्यानंतर ही घोषणा करण्यात आली

Advertisement
Sep 06, 2025 13:13 (IST)

Ganpati Visarjan 2025 : चिंचपोकळीच्या चिंतामणी विसर्जनादरम्यान गणेशभक्तांमध्ये उत्साह

Sep 06, 2025 13:08 (IST)

Live Update : कोल्हापुरात विविध वेशभूषा, पारंपारिक वाद्य, टाळ मृदुंग आणि मोरयाच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप

कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत विविध वेशभूषा, पारंपारिक वाद्य, टाळ मृदुंग आणि मोरयाच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप दिला जात आहे. नवसाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा भाविक मिरवणुकीमध्ये गर्दी करत आहेत. सामाजिक संदेश देणारे बॅनर, वेशभूषा या मिरवणुकीमध्ये चर्चेत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉल्बीचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहे मात्र विविध ढोल पथके, लेझीम पथके लक्ष वेधून घेत आहेत.  पारंपारिक वाद्यांच्या गजरात सुरू असलेल्या मिरवणुकीला हळूहळू गर्दी देखील वाढत आहे.

Advertisement
Sep 06, 2025 13:05 (IST)

Live Update : गणेश गल्लीचा गणपती मुख्य प्रवेशद्वारा बाहेर येत आहे...

गणेश गल्लीचा गणपती मुख्य प्रवेशद्वारा बाहेर येत आहे...

Sep 06, 2025 12:47 (IST)

Live Update : नाशिकमध्ये पावसाची जोरदार हजेरी, पावसाचा गणेश विसर्जन मिरवणुकीवर परिणाम

नाशिकमध्ये पावसाची जोरदार हजेरी, पावसाचा गणेश विसर्जन मिरवणुकीवर परिणाम 

- पावसातच ढोल वादन सुरू, वेगाने चित्ररथ होतायत मार्गस्थ

- पावसामुळे नाशिककरांनीही मिरवणुकीकडे फिरवली पाठ

Sep 06, 2025 12:43 (IST)

Ganpati Visarjan 2025 : मानाचा लाकडी गणपती अग्रस्थानी;जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते आरती नंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

देशभरात गणेश उत्सव दहा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. आज अनंतचतुर्थीच्या दिवशी पप्पा गणरायाचे विसर्जन करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे आज अनंत चतुर्दशी निमित्त गणरायाचे विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.प्रसिद्ध असलेल्या अय्याची कोटी मानाच्या लाकडी गणपतीला विसर्जन मिरवणुकीमध्ये विशेष महत्त्व असतं, अग्रस्थानी श्री मानाचा लाकडी गणपती त्यांनंतर तानाजी गणेश मंडळ ,हनुमान गणेश मंडळ व राणा गणेश मंडळ, ही चार मंडळ दरवर्षी मिरवणुकीच्या आधी असतात. 

त्यानंतर इतर गणेश मंडळाचे लकी ड्रॉ प्रमाणे काढण्यात आलेल्या नंबर नुसार एकुण 29 गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.त्यामुळे बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करतात. विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वी मानाच्या लाकडी गणपतीची जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गणरायाची आरती करून सकाळी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.तर मिरवणूक मार्गावर मुख्य ठिकाणी न.प. व पोलिस प्रशासनाच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. तर विसर्जन मिरवणूक मार्गावरील निर्मल टर्निंग ते राणा गेट व शिवाजी वेस हे बोरीपुरा पर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे. तसेच 22 रस्ते बंद करण्यात आले आहे.मिरवणुक मार्गावर सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेऱ्यांचीही करडी नजर राहणार आहे. तर राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर हे त्यांच्या तानाजी मंडळासह मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.

Sep 06, 2025 12:43 (IST)

Ganpati Visarjan 2025 : मानाचा लाकडी गणपती अग्रस्थानी;जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते आरती नंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

देशभरात गणेश उत्सव दहा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. आज अनंतचतुर्थीच्या दिवशी पप्पा गणरायाचे विसर्जन करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे आज अनंत चतुर्दशी निमित्त गणरायाचे विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.प्रसिद्ध असलेल्या अय्याची कोटी मानाच्या लाकडी गणपतीला विसर्जन मिरवणुकीमध्ये विशेष महत्त्व असतं, अग्रस्थानी श्री मानाचा लाकडी गणपती त्यांनंतर तानाजी गणेश मंडळ ,हनुमान गणेश मंडळ व राणा गणेश मंडळ, ही चार मंडळ दरवर्षी मिरवणुकीच्या आधी असतात. 

त्यानंतर इतर गणेश मंडळाचे लकी ड्रॉ प्रमाणे काढण्यात आलेल्या नंबर नुसार एकुण 29 गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.त्यामुळे बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करतात. विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वी मानाच्या लाकडी गणपतीची जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गणरायाची आरती करून सकाळी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.तर मिरवणूक मार्गावर मुख्य ठिकाणी न.प. व पोलिस प्रशासनाच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. तर विसर्जन मिरवणूक मार्गावरील निर्मल टर्निंग ते राणा गेट व शिवाजी वेस हे बोरीपुरा पर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे. तसेच 22 रस्ते बंद करण्यात आले आहे.मिरवणुक मार्गावर सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेऱ्यांचीही करडी नजर राहणार आहे. तर राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर हे त्यांच्या तानाजी मंडळासह मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.

Sep 06, 2025 12:15 (IST)

Ganpati Visarjan 2025 : नवी मुंबईत आतापर्यंत 33 हजारांहून अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन पूर्ण

नवी मुंबईत आतापर्यंत 33 हजारांहून अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन पूर्ण

नवी मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनाचा उत्साह मोठ्या प्रमाणात आहे.

 नवी मुंबई महानगरपालिकेतील गणेश विसर्जना वेळी प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे 

 आतापर्यंत तब्बल 33,000 गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांसाठी 22 नैसर्गिक तलाव तसेच 40 हून अधिक कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. पर्यावरणपूरक विसर्जनावर भर देत ही सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कायदोव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनीही मोठी तयारी केली आहे. गणेश विसर्जनासाठी तब्बल 2400 हून अधिक पोलीस कर्मचारी, तसेच 7 डीसीपी व 11 एसीपी यांची संपूर्ण फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

गणेश विसर्जनाचा उत्सव शांततेत, सुरक्षिततेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावा यासाठी पालिका प्रशासन आणि नवी मुंबई पोलिस यंत्रणा सतर्क आहे

Sep 06, 2025 12:15 (IST)

Live Update : मुंबईच्या मिरवणुकीत एका चोराला पकडण्यात पोलिसांना यश

मुंबईच्या मिरवणुकीत एका चोराला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे

तेजुकाया गणपती मिरवणुकीत हा चोर शिरला. मिरवणुकीचे कपडे त्याने घातले होते

मात्र कार्यकर्ते आणि पोलिसांच्या सतकर्तेमुळे हा चोर पकडला गेला

Sep 06, 2025 12:03 (IST)

Live Update : पुण्याच्या मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळांची विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रोडवर दाखल

पुण्याच्या मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळांची विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रोडवर दाखल झाली. 

विसर्जन मिरवणुकीत अश्वराज बँड पथक, नादब्रह्म ढोल पथक , नगरकर बंधू यांचे चौघडा वादन सहभागी झाले आहेत.

फुलांच्या आकर्षक अशा रथात श्रींची मूर्ती विराजमान करण्यात आली आली आहे.

डिजेच्या  तालावर तरुणाई ही थिरकू लागली आहे.

Sep 06, 2025 12:01 (IST)

Ganpati Visarjan 2025 : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज 61 सार्वजनिक, तर 36 हजार 405 घरगुती गणपतीचे होणार विसर्जन

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज 61 सार्वजनिक तर 36 हजार 405 घरगुती गणपतीचे विसर्जन होणार आहे. त्यासाठी पोलिसांसह इतर शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. दुपारी चार नंतर जिल्ह्यातल्या बहुतांश भागात गणेश विसर्जनाला सुरुवात होईल. दरम्यान नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढाव्यात. कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी असा आवाहन पोलिसांनी केलं आहे. 

Sep 06, 2025 11:14 (IST)

Ganpati Visarjan 2025 : कोल्हापुरातील मानाचा पहिला गणपती तुकाराम माळी तालीम मंडळ यांची पालखीतून मिरवणूक

कोल्हापुरातील मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला मोठ्या जल्लोषी वातावरणात सुरुवात झाली. दरवर्षी विसर्जन मिरवणुकीचा पहिला मान या मंडळाच्या गणपतीला असतो. विसर्जन मिरवणुकीत पूर्वी खरे खरे वाघ, अस्वल आणणारे हे मंडळ आहे. खासदार शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मंडळाच्या पालखीतील मानाच्या गणपती बाप्पासमोर श्रीफळ वाढवून मिरवणुकीला प्रारंभ केला. या मिरवणुकीत ढोल ताशा पथक, तांत्रिक हत्तीवर स्वार झालेला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या वेशभूषेतील चिमुकला, पारंपारिक वेशभूषेतील महिला, लहान मुले आणि शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुकीत सहभागी झालेले मंडळाचे सर्व कार्यकर्ते होते. छत्रपती शाहू महाराज, तिरुपती बालाजी, सामाजिक संदेश देणारे बॅनर मिरवणुकीत आहेत. 

Sep 06, 2025 11:12 (IST)

Ganpati Visarjan 2025 : चिंचपोकळीच्या चिंतामणी विसर्जन सोहळ्याला सुरुवात

Sep 06, 2025 11:09 (IST)

Live Update : लालबागचा राजा विसर्जन मिरवणूक पाहा Live

Sep 06, 2025 10:58 (IST)

Live Update : लालबागचा राजा चिंचपोकळी रेल्वे पुलावर कधीपर्यंत पोहोचेल, मिरवणुकीचा मार्ग अन् वेळापत्रक पाहा

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आणि वेळापत्रक

लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात सकाळी 10 ते 12 या वेळेत मंडळाच्या जागेतून होईल. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' च्या गजरात राजाचा प्रवास सुरू होईल. दुपारी 1 ते 2 या वेळेत राजा चिंचपोकळी रेल्वे पुलावर पोहोचेल. या ऐतिहासिक ठिकाणी पूल आणि खाली दोन्ही ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते.

पुढे, दुपारी 3 ते 5 या वेळेत राजाचा प्रवास भायखळा स्टेशनच्या दिशेने होईल. त्यानंतर नागपाडा चौकात रात्री 7 ते 9 या वेळेत राजा पोहोचेल. गोल देऊळ राजाची मिरवणूक रात्री 10 ते 12 या वेळेत पोहोचेल. ऑपेरा हाऊस पूल याठिकाणी पहाटे 2 ते 4 या वेळेत लालबागचा राजा पोहोचेल.

त्यानंतर अखेरचा टप्प्यात गिरगाव चौपाटीवर 7 सप्टेंबरच्या पहाटे 5 ते 7 वाजेच्या दरम्यान लालबागच्या राजाचे विसर्जन अरबी समुद्राच्या होईल. (Arabian Sea) लाटांमध्ये गिरगाव चौपाटीवर होईल. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतानाचा हा क्षण अत्यंत भावनिक असतो. 

Sep 06, 2025 10:56 (IST)

Live Update : पुणे, मुंबईला हवामान विभागाकडून यल्लो अलर्ट...

पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून यल्लो अलर्ट देण्यात आला असून पुढील ३ तासात संभाजीनगर, जळगाव, नांदेड, नंदुरबार, पुणे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे. 

Sep 06, 2025 10:49 (IST)

Live Update : नागपूर विसर्जनादरम्यान चार हजार पोलिसांचा बंदोबस्त

नागपूर शहरात आज विसर्जनाची धूम असून शहरात सुमारे चार हजार पोलिस आज नागपूरच्या रस्त्यांवर बंदोबस्तात आहेत.

नागपूर शहरामध्ये सर्वत्र कृत्रिम टाक्यांमध्ये घरगुती गणेश विसर्जन करण्याची पद्धत भाविकांनी स्वीकारल्याचे आशादायी चित्र या निमित्ताने दिसून येत आहे. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरभरात घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन मोठ्या संख्येने कृत्रिम टाक्यांमध्ये करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

शहरात 216 स्थानांवर 419 कृत्रिम टाक्यांची महापालिकेद्वारे व्यवस्था करण्यात आली असून तिथे गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे.

 पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका आणि विविध सामाजिक संस्थांनी यावर्षी शहरातील प्रमुख ठिकाणी कृत्रिम टाक्यांची व्यवस्था केली आहे.

सकाळपासूनच नागरिकांनी ढोल-ताशांच्या गजरात, गाण्यांच्या सुरावटीत आणि भक्तिभावाच्या वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले. विशेष म्हणजे, यंदा घरगुती गणपती विसर्जनासाठी कृत्रिम टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून आला. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरताना दिसत आहे.

Sep 06, 2025 10:48 (IST)

Live Update : मानाचा चौथा गणपती मंडई चौकात दाखल

मानाचा चौथा गणपती मंडई चौकात दाखल 

मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडई चौकात दाखल 

तब्बल एक तासाने मंडई चौकात दाखल 

मानाच्या तिसऱ्या गणपती मंडळाने नियम मोडल्याने १ तास स्थिर वादन चालू असल्याने मागच्या गणपती मंडळांना झाला विलंब

Sep 06, 2025 10:44 (IST)

Live Update : भाजपचा राजा गणरायाची धुळ्यात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

राज्यातील सर्वोत्कृष्ठ अशा हायटेक असलेल्या धुळ्यातील भाजपा कार्यालयात भाजपचा राजा गणराय विराजमान झाला होता आणि आता भाजपाचा गणरायाची विसर्जन मिरवणुक काढण्यात आली आहे. या विसर्जन मिरवणुकीत माजी महापौर, उपमहापौरांसह महिला आघाडीने गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत जल्लोष लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला.... फुलांनी सजविलेल्या बैलगाडीतून भाजपाच्या राजाची विसर्जन मिरवणुक काढण्यात आली... ढोल पथकासह पारंपारीक वाद्य वाजवत गणरायाला निरोप देण्यात आला.. विसर्जन मिरवुणकीत भाजपाचे सर्वच कार्यकर्ते सहभागी झाले होते. गुलाल उधळत, बाप्पाचा जयघोष करत, बाप्पाची विसर्जन मिरवणुक काढण्यात आली...

Sep 06, 2025 10:43 (IST)

Live Update : वाशिममध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

 गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... अशा गजरात आज वाशिम शहरात पहिल्या मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.वाशिम शहरात आज सकाळी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघाचे खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते पहिल्या मानाच्या शिवशंकर मंडळ गणपतीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सकाळी 10 वाजतापासून छत्रपती शिवाजी चौकातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.या मिरवणुकीत शहरातील 30 गणेशोत्सव मंडळ सहभागी झाले आहेत. ढोल-ताशांच्या गजरात, बँडच्या तालावर नाचत-थिरकत भाविकांनी उत्साहात सहभाग घेतला आहे.मिरवणुकीदरम्यान बालू चौक, मन्नासिंग चौक, बाहेती गल्ली, काटीवेश मार्गे जातं असून पुढे देवतलाव येथे बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.

Sep 06, 2025 10:37 (IST)

pune ganpati visarjan miravnuk live : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक पाहा Live

Sep 06, 2025 10:35 (IST)

Live Update : पुण्याचं ग्रामदैवत आणि पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपती मंडई चौकात दाखल

पुण्याचं ग्रामदैवत आणि पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपती मंडई चौकात दाखल

पालकमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पार पडणार कसबा गणपतीची आरती

कसबा गणपतीची आरती पार पडल्यानंतर पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला होणार सुरुवात

तर निलम गोरहे, चंद्रकांती पाटील, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे देखील उपस्थित

Sep 06, 2025 10:34 (IST)

Live Update : पुण्याचा राजा आणि मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती मंडई चौकात दाखल

पुणे 

पुण्याचा राजा आणि मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती मंडई चौकात दाखल

Sep 06, 2025 09:37 (IST)

Pune Ganpati Visarjan LIVE Update: कसबा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ

अजित पवार चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पुण्याच्या मानाचा पहिला कसबा गणपतीच्या पालखीला खांदा,  पुण्याची मिरवणूक सुरू,  मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ!

Sep 06, 2025 09:36 (IST)

Pune Ganpati Visarjan LIVE Update: पुण्यात गणपती विसर्जनाचा उत्साह, मानाच्या चौथ्या बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात

पुण्यातील मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.  यंदा मंडळाला 125 वर्षे पूर्ण झाली आहेत या निमित्तानेआकर्षक अशा फुलांनी सजवलेल्या मयूर रथामधे श्रींची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे.

तुळशीबाग गणपती हा चांदीच्या व्यापाऱ्यांचा गणपती म्हणून ओळखला जातो. बापाच्या मूर्तीवर देखील चांदीची आभूषणे चढण्यात आली आहेत. मिरवणुकीमध्ये स्वरूपवर्धनी, गजलक्ष्मी, शिवमुद्रा हे ढोल पथके सहभागी होणार आहेत.

Sep 06, 2025 09:14 (IST)

Pune Ganpati Visarjan LIVE Updates: मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.....

उत्सव मंडपातून मूर्ती देशी विदेशी फुलांनी सजवलेल्या आकर्षक अशा रथा मध्ये विराजमान करण्यात आली आहे......

रथावर नंदी, त्रिशूळ आणि वरती भगवान शिव पार्वती यांची मूर्ती व मध्ये भागी बाप्पाची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे.......

Sep 06, 2025 09:08 (IST)

Pune Ganpati Visarjan LIVE Updates: पुण्यातील मानाच्या दुसऱ्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

पुण्याचा मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात......

विसर्जन मिरवणुकीमध्ये पुढे चौघडा गाडी त्यामागे गंधर्व बँड पथक आणि हत्ती वरती छत्रपती शिवाजी महाराजांची  मूर्ती .

Sep 06, 2025 08:45 (IST)

Pune Ganpati Visarjan LIVE Update: पुण्यातील मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक कधी सुरु होणार? वाचा सर्व नियोजन

विसर्जन मिरवणुकीच्या वेळेचं नियोजन

मानाचा पहिला गणपती कसबा गणपती

लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): ९.३० वाजता

बेलबाग चौकः १०.१५ वाजता

कुंटे चौकः ११.४५ वाजता

विजय टॉकीज चौकः १.४० वाजता

टिळक चौक: २.४५ वाजता

मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी

लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): ९.४५ वाजता

बेलबाग चौकः १०.३० वाजता

कुंटे चौकः १२ वाजता

विजय टॉकीज चौकः १.५५ वाजता

टिळक चौकः ३ वाजता

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम

लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): १० वाजता

बेलबाग चौकः ११ वाजता

कुंटे चौकः १२.४५ वाजता

विजय टॉकीज चौकः २.३० वाजता

टिळक चौकः ३.३० वाजता

मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मंडळ

लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): १०.१५ वाजता

बेलबाग चौकः ११.३० वाजता

कुंटे चौक: १.३० वाजता

विजय टॉकीज चौकः ३ वाजता

टिळक चौकः ४ वाजता

मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा

लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): १०.३० वाजता

बेलबाग चौकः १२ वाजता

कुंटे चौकः २ वाजता

विजय टॉकीज चौकः ३.३० वाजता

टिळक चौक: ४.३० वाजता

Sep 06, 2025 08:43 (IST)

lalbaugacha Raja Visarjan Update: लालबागचा राजाच्या विसर्जन मार्गावरील प्रमुख टप्पे, कुठे घ्याल अंतिम दर्शन?

लालबाग मार्केट व चिंचपोकळी स्टेशन (पश्चिम) : लालबाग उड्डाणपुलाखाली भाविकांचा पहिला निरोप.

भायखळा स्टेशन (पश्चिम) : डेलिसल रोडपासून S-ब्रिज ओलांडत मूर्तीचा पुढील प्रवास.

हिंदुस्तान मशीद, भायखळा : सांप्रदायिक सौहार्दाचे प्रतीक मानला जाणारा हा थांबा. येथे मशिदीच्या समिती सदस्यांकडून दरवर्षी मूर्तीचे स्वागत केले जाते.

भायखळा अग्निशमन दल : अग्निशमन दलाच्या जवानांकडून लालबागच्या राजाला विशेष श्रद्धांजली वाहण्यात येते. मेगा अग्निशमन केंद्रातील सर्व वाहनांकडून गणेशमूर्तीला श्रद्धांजली वाहण्यासाठी सायरन वाजवून श्रद्धांजली वाहण्यात येते.

नागपाडा चौक (खडा पारसी/एस. मोहनी चौक) : रंगेबिरंगी विद्युत रोषणाई आणि भाविकांच्या गर्दीचा मोठा टप्पा

गोल देऊळ/दो टाकी क्षेत्र : गजबजलेल्या बाल्कनी आणि गल्ल्यांसह ऐतिहासिक परिसर.

ऑपेरा हाऊस ब्रिज (सीपी टँक/प्रार्थना समाज/एसव्ही रोड) : येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत मिरवणूक शेवटच्या टप्प्याकडे जाते.

गिरगाव चौपाटी : 'पुढच्या वर्षा लवकर या' म्हणत दुसऱ्या दिवशी पहाटे अरबी समुद्रात बाप्पाला शेवटचा निरोप दिला जातो.

Sep 06, 2025 08:29 (IST)

Maharashtra Ganpati Visarjan LIVE Updates: गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर महसूलच्या पथक नेमणूक

अकोला शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक आज शनिवारी ६ सप्टेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या आदेशानुसार, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहा पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांमध्ये पाच नायब तहसीलदार आणि २२ महसूल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे पथक सहा प्रमुख चौकांमध्ये लक्ष ठेवणार आहे.

Sep 06, 2025 08:27 (IST)

Ganpati Visarjan LIVE Updates: पुण्यातील मंडई चौकात विसर्जनाची लगबग, मानाचे गणपती मार्गस्थ होणार

पुण्यातील मंडई चौकात विसर्जनाची लगबग!

पाचही मानाच्या गणपतीची मिरवणूक याच मंडई चौकातून निघणार 

लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला हार घालून पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला होणार सुरुवात 

मंडई चौकात आकर्षक रांगोळी 

Sep 06, 2025 08:19 (IST)

Pune Ganpati Visarjan LIVE Update: मानाच्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

पुण्यामध्येही कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात  झाली आहे. ढोल ताशांच्या गजरात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. 

Sep 06, 2025 08:17 (IST)

Mumbai Ganpati Visarjan LIVE Updates News: गणेश गल्लीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

मुंबईतील पहिला मानाचा गणपती अशी ख्याती असलेल्या ‘विश्वविक्रमी' मुंबईच्या राजाची विसर्जन आरती ठीक. सकाळी ८.०० वाजता सुरू होईल व त्यानंतर गिरगाव चौपाटी च्या दिशेने विसर्जन मिरवणुक मार्गस्थ होईल. ठरल्याप्रमाणे गणेश गल्लीच्या राजा मंडपाबाहेर आला आहे. 

Sep 06, 2025 08:08 (IST)

Mumbai Ganpati Visarjan LIVE Updates News: लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला 10 वाजता सुरुवात होणार

मुंबईमधील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला दहा  वाजता सुरु होणार आहे. १० दिवस मनोभावी सेवा केल्यानंतर आज लाडक्या बाप्पाला निरोप देताना गणेशभक्त भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

Sep 06, 2025 08:05 (IST)

Ganpati Visrjan LIVE Update: परळच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

मुंबईमध्ये परळच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर मुंबईच्या राजाच्याही थोड्याच वेळात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. 

Sep 06, 2025 08:03 (IST)

Ganpati Visarjan LIVE Update: गणेश गल्लीच्या राजाची आरती संपन्न, थोड्याच वेळात मिरवणुकीला सुरुवात

मुंबईतील गणेश गल्लीच्या राजाची आरती संपन्न झाली आहे. दुसरीकडे पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचीही आरती संपन्न झाली आहे. दोन्ही मानाच्या पहिल्या गणपतींचे दर्शन झाल्यानंतर आता बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. 

Sep 06, 2025 08:01 (IST)

Ganpati Visrjan LIVE Update: गणपती विसर्जनासाठी 21 ठिकाणी व्यवस्था

गणेश विसर्जनासाठी छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेने शहरातील 21 विविध ठिकाणी व्यवस्था केली आहे. यामध्ये विहिरी, तलाव आणि कृत्रिम तलावाचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी पाच फुटांच्या खालील मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्यावरील मूर्तींचे विसर्जन मंडळानी स्वतः करण्याचे आवाहन महानगर पालिकेने केले आहे. तर शहरातील 19 रस्ते विसर्जन काळात बंद राहतील अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.

Sep 06, 2025 08:00 (IST)

Pune Ganpati Visarjan LIVE Update: पुण्यात गणपती विसर्जनाचा उत्साह

पुण्यात गणपती विसर्जनाचा उत्साह

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आरतीला सुरुवात

थोड्याच वेळात दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपातून मुख्य मंदिराकडे निघणार

मुख्य मंदिरातून संध्याकाळी ४ वाजता मिरवणुकीला होणार सुरुवात

Sep 06, 2025 07:21 (IST)

Live Update : पुण्याचे पालकमंत्री अजित पवार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात

अजित पवारांच्या हस्ते मुख्य मंदिरात होणार पूजा आणि आरती

थोड्याच वेळात दगडूशेठ बाप्पा मुख्य मंदिरातील येणार

अजित पवार यांच्यासोबत सुनेत्रा पवार देखील दगडूशेठ मंदिरात

अजित पवार सपत्नीक करणार दगडूशेठ बाप्पांची आरती

Sep 06, 2025 07:21 (IST)

Live Update : गणेश विसर्जनासाठी पुण्याच बंद असलेले प्रमुख रस्ते

गणेश विसर्जनासाठी पुण्याच बंद असलेले प्रमुख रस्ते

गणेश विसर्जन मिरवणूक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 9:00 वाजता सुरू होणार असून, मिरवणूक संपेपर्यंत (7 सप्टेंबरपर्यंत) खालील रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील.

शिवाजी रोड: काकासाहेब गाडगीळ पुतळा चौक ते जेधे चौक (सकाळी 7:00 पासून)

लक्ष्मी रोड: संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौक (सकाळी 7:00 पासून)

बाजीराव रोड: सावरकर चौक ते फुटका बुरूज चौक (दुपारी 12:00 पासून)

कुमठेकर रोड: टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक (दुपारी 12:00 पासून)

गणेश रोड: दारूवाला पूल ते जिजामाता चौक (सकाळी 10:00 पासून)

केळकर रोड: बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक (सकाळी 10:00 पासून)

टिळक रोड: जेधे चौक ते टिळक चौक (सकाळी 9:00 पासून)

शास्त्री रोड: सेनादत्त चौकी चौक ते अलका (दुपारी 12:00 पासून)

जंगली महाराज रोड: झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक (सायं. 4:00 पासून)

कर्वे रस्ता: नळ स्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक (सायं. 4:00 पासून)

फर्ग्युसन रोड: खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेट (सायं. 4:00 पासून)

भांडारकर रस्ता: पीवायसी जिमखाना ते गुडलक चौक ते नटराज चौक (सायं. 4:00 पासून)

पुणे-सातारा रोड: व्होल्गा चौक ते जेधे चौक (सायं. 4:00 पासून)

सोलापूर रोड: सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक (सायं. 4:00 पासून)

प्रभात रोड: डेक्कन पोस्टे ते शेलारमामा चौक (सायं. 4:00 पासून)

बगाडे रोड: सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक (सकाळी 9:00 पासून)

गुरू नानक रोड: देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक (सकाळी 9:00 पासून)

Sep 06, 2025 07:17 (IST)

Live Update : मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान पावसाचं सावट

मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान पावसाचं सावट

मुंबईसह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. आज विसर्जनादरम्यान मुंबई आणि उपनगरात पावसाचं सावट पाहायला मिळत आहे.