योगेश शिरसाठ, अकोला
Akola News : लग्नाला नकार दिल्याने तरुणीवर चाकू हल्ला केल्याची घटना अकोल्यात घडली आहे. नर्स असलेल्या तरुणीचा चाकू भोकसून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संतोष डिवरे असं चाकू हल्ला करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अकोल्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील सोनाळा रस्त्यावर ही घटना घडली. बोरगाव मंजू पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष डिवरे आणि जखमी तरुणी हे दोघे चांगले मित्र आहेत. दोघेही बोरगाव मंजू परिसरात फिरायला गेले होते. याच दरम्यान संतोषने तरुणीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र तरुणीने स्पष्ट नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला.
(नक्की वाचा- Shirdi News : फाड-फाड इंग्रजी, डोळ्यात पाणी; शिर्डीत भीक मागताना सापडला ISRO चा अधिकारी)
याच वादादरम्यान तरुणाने त्याच्या जवळील चाकूने तिच्यावर हल्ला केला. या घटनेत तरुणी गंभीर स्वरूपात जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीची प्रकृती स्थिर आहे. पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत.