योगेश शिरसाट, अकोला
Akola Crime News : हॉर्न वाजवण्याच्या वादातून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अकोल्याच्या अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर मस्तानी चौकात ही घटना घडली. अहमद खान शकूर खान यांचा या वादात मृत्यू झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, अहमद खान शकूर खान यांच्या सोबत झालेल्या वादानंतर त्यांच्यावर चाकूने वार करत पोटात चाकू भोगसून त्यांना ठार मारण्यात आले. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवरही जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.
( नक्की वाचा : Pune Palkhi 2025: पालखी सोहळ्यासाठी पुण्यातील वाहतुकीत बदल, वाचा सर्व अपडेट सविस्तर )
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका दुचाकीस्वाराने मोठ्याने हॉर्न वाजवला. यावर आक्षेप घेतल्यानंतर हा वाद सुरू झाला. ज्याचे रूपांतर लवकरच शिवीगाळीत झाले. शुल्लक कारणावरून सुरू असलेल्या वादात हल्ल्याखोराने चाकू काढला आणि अहमद खानवर चाकूने, पोटात वार केले.
(नक्की वाचा : मद्यधुंद गुंडाचा हैदोस, तरुणावर प्राणघातक हल्ला, प्रकृती चिंताजनक)
या हल्ल्यात अहमद खान गंभीर जखमी झाला होता. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केला, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी, अकोट फाइल पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा तपास सुरू केला आहे.