Asha Bhosle Death Live Update:आशा भोसले यांचे ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांना हृदयविकाराचा झटका आणि फुफ्फुसाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरूवाती पासून त्यांची प्रकृती नाजूक होती. शेवटी आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. यावेळी सांस्कृतीक कार्यमंत्री आशिष शेलार ही उपस्थित होते. उद्या सोमवारी आशा भोसले यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
00:00 Asha Bhosle Death Live Update: देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रसाद लाड निवासस्थानी दाखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड आशा भोसले यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
Asha Bhosle Death Live Update: आशा भोसले यांचं पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयातून निघालं
आशा भोसले यांचं पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयातून निवासस्थानाकडे निघालं आहे. उद्या दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
Asha Bhosle Death Live Update: ज्येष्ठ पत्रकार सुधीर गाडगीळ यांनी आशाताईंना वाहिली श्रद्धांजली,म्हणाले..
"माझ्याकडे आशाताईंच्या प्रचंड आठवणींचा साठा असूनही मला त्या सूचत नाहीत. त्यांच्या जाण्यामुळे मला इतकी अस्वस्थता आहे. मी आशाताईंच्या आठवणी यापूर्वीच शब्दबद्ध केल्या आहेत.दहा बारा पुस्तकातून त्यांच्या आठवणी आल्या आहेत.उत्तुंग नावाचं पुस्तक आलं आहे.त्याच्यात मी त्यांच्या आठवणी सविस्तरपणे दिल्या आहेत", अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार सुधीर गाडगीळ यांनी दिली आहे.
Asha Bhosle Death Live Update: माझ्या प्रगतीत आशाताईंचा मोलाचा हातभार होता - हेमा मालिनी
Asha Bhosle Death Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशाताईंना वाहीली श्रद्धांजली
Asha Bhosle Death Live Update: क्रीडा विश्वातूनही शोक व्यक्त
Asha Bhosle Death Live Update: शंकर महादेवन यांनी वाहीली अनोखी श्रद्धांजली
Asha Bhosle Death Live Update: आशाताईंच्या निधनाने एकनाथ शिंदे झाले भावूक
Asha Bhosle Death Live Update: आशा भोसले यांच्या निधनाची घोषणा मुलगा आनंद यांनी केली
Asha Bhosle Death Live Update: कधी ही भरून न निघणारी पोकळी - अक्षय कुमार
Asha Bhosle Death Live Update: आशा भोसलेंच्या आठवणी राजनाथ सिंह यांनी केल्या ताज्या
Asha Bhosle Death Live Update: काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करत श्रद्धांजली
Asha Bhosle Death Live Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी व्यक्त केलं दुख:
महाराष्ट्राच्या प्राण कोकिळा आशा भोसले यांचं दुःखद निधन झाला आहे. यावर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता ही वाईट बातमी समजली. आशाताईंचं दुःखद निधन झालं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची खूप मोठी हानी झाली आहे.
सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री
Asha Bhosle Death Live Update: जगण्यातील श्रीमंती गमावली - आशिष शेलार
Asha Bhosle Death Live Update: देवेंद्र फडणवीस आशाताईंच्या निधनावर काय म्हणाले?
Asha Bhosle Death Live Update: शरद पवारांनी आशाताईंसाठी व्यक्त केली आपली भावना
आशाताईंच्या रूपाने भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज हरपला आहे. त्यांच्या निधनामुळे संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळाला आहे. त्यांच्या आवाजातली खुमारी, चपळता आणि भावनांची खोली ही त्यांची खरी ओळख ठरली. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतविश्वासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. आज त्यांचा आवाज थांबला असला, तरी त्यांचे सूर सदैव घुमत राहतील. आशाताईंनी प्रत्येक भारतीय संगीतप्रेमींच्या मनात निर्माण केलेले अढळ स्थान कायम राहील. राष्ट्रीय पुरस्कार, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके अशा असंख्य पुरस्कारांच्या मानकरी आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
Asha Bhosle Death Live Update: उद्धव ठाकरेंची आशाताईंबद्दल ह्रदयस्पर्शी पोस्ट
आशा भोसले यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दु:ख झाले. भारतीय संगीत विश्वातील एक अमर आवाज आज शांत झाला. त्यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला, भावनांना स्पर्श केला. त्या एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते,लता दीदी यांच्या नंतर त्या संगीत क्षेत्रातील एका महान पर्वाच्या स्तंभा प्रमाणे उभ्या होत्या,
भारतीय संगीत क्षेत्रातील हा स्तंभ कोसळला, त्यांचे गाणे हेच त्यांचे अमरत्व राहील त्यांच्या स्मृतीला विनम्र श्रद्धांजली.
उद्धव ठाकरे
शिवसेना पक्ष प्रमुख
Asha Bhosle Death Live Update: शहाजी बापू पाटील यांनी वाहीली आदरांजली
अशा भोसले यांनी देशातील विविध भाषांत गाणी गायन केले. किशोर कुमार यांच्यासोबतची त्यांची गाणी म्हणजे प्रत्येक सामान्य नागरिकाचे मनोरंजन करणारी होती. आशाताई यांचे निधन म्हणजे महाराष्ट्राचे वैभव हरपल्यासारखे आहे. हिंदी गाण्यांसोबत अभंग व आध्यात्मिक क्षेत्रातील देखील अनेक गाणी आशाताई व लतादीदींनी गायली. ती आजही आठवणीत आहेत. आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. अशा शब्दात सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करत प्रतिक्रिया दिली आहे.
Asha Bhosle Death Live Update: आशा ताईंच्या निधनाने महाराष्ट्र हळहळला- भरत गोगावले
आशाताई भोसले यांच्या निधनाची बातमी समजणं खूप दुःखद आहे. मंगेशकर कुटुंबात जन्म घेतलेल्या आशाताई यांच्या निधनामुळे आज संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय. आपणही त्यांच्या दुःखात सामील असून महाराष्ट्राच्यावतीने शिवसेनेच्या वतीने आपण श्रद्धांजली अर्पण करत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे फलोत्पादन तथा रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे..
Asha Bhosle Death Live Update: ममता बॅनर्जी यांनी आशाताईंच्या निधनावर व्यक्त केले दुख:
Asha Bhosle Death Live Update: आशा भोसले यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा
Asha Bhosle Death Live Update: आशा भोसले यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. आशा ताईंच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये कधी ही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
Asha Bhosle Death Live Update: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितल्या आठवणी
Asha Bhosle Death Live Update: नितीन गडकरींनी सांगितली नागपूरची आठवण
नागपूरची आठवण आशाताईंची आहे. एक अशा गायीकेला आपण मुकलोय ज्यांनी सगळ्या जगात आपल्या देशाचे नाव पोहोचवले. आशाताई सदैव आपल्या सगळ्यांच्या मनात राहतील. अशा भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या आहेत.
Asha Bhosle Death Live Update: छगन भुजबळांनी व्यक्त केल्या आपल्या भावना
छगन भुजबळ यांची प्रतिक्रीया
लता मंगेशकर आपल्यातून २०२२ मध्ये गेल्या. त्यांच्यानंतर आता आशा भोसले यांची बातमी आली. १२ हजार पेक्षा जास्त गाणी त्यांनी गायली आहेत. हिंदी नाही तर देशातील इतर भाषेत देखील त्यांनी गायले आहे.
राज्य शासनाने देखील त्यांना महाराष्ट्र भूषण दिला. चित्रपट क्षेत्रातला मोठा पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. हजारो गाणे आजही लोकांमध्ये वाजवली जातात. एकली जातात. देशाने आणखी एक महत्वाची गायिका संपूर्ण जगता मध्ये त्यांचे नाव आहे अशा यांना मी माझ्या कुटुंबाकडून सर्वांच्या वतीने आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो. आपल्या नंतर देखील त्यांचे गाणे अशा ताई यांची आठवण येईल.
Asha Bhosle Death Live Update: आशा भोसलेंना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
लहान पणापासून त्या गायनात होत्या. त्यांनी क्लासिकल गाणं ही गायलं होतं आणि रॉक्स गाणी ही त्यांनी गायली. विवीध प्रकारची गाणी गाण्याचा त्यांचा हातखंड होता. मंगेशकर कुटुंबातला दुसरा तारा निखळला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसले यांनी श्रद्धांजली अर्पण केली. देशातील आणि जगातील संगीत प्रेमींसाठी आजचा दिवस दुखाचा आहे असं ही त्यांनी सांगितलं. आशा ताईंनी आयुश्यभर संगीताची सेवा केली असं ही ते म्हणाले.
Asha Bhosle Death Live Update: अनेक पुरस्काराच्या ठरल्या होत्या मानकरी
दोन वेळा राष्ट्रीय तर सात वेळा फिल्म फेअर पुरस्कार आशा भोसले यांना मिळाला होता. त्यांनी जवळपास 12000 गाणी गायली होती. त्यांनी वयाच्या ९० व्या वर्षी शेवटचा लाईव्ह शो केला होता.
Asha Bhosle Death Live Update: उषा मंगेशकर रुग्णालयात पोहचल्या
Asha Bhosle Death Live Update: आशा भोसले यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या बहीणी उषा मंगेशकर या रुग्णालयात पोहचल्या आहेत. यावेळी त्यांना आश्रू अनावर झाले.
Asha Bhosle Death Live Update: शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
Asha Bhosle Death Live Update: आशा भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. अशी माहिती सांस्कृतीक कार्य मंत्र आशिष शेलार यांनी दिली आहे.
Asha Bhosle Death Live Update: आशा ताईंचे अंत्यदर्शन उद्या घेता येणार
Asha Bhosle Death Live Update: आशा ताईंचे अंत्यदर्शन उद्या सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत घेता येणार आहे. अंत्यदर्शन हे त्यांच्या लोअर परळ इथल्या निवासस्थानी घेता येणार आहे.
Asha Bhosle Death Live Update: आशा भोसलें यांच्यावर उद्या सोमवारी अंत्यसंस्कार होणार
Asha Bhosle Death Live Update: आशा भोसलें यांच्यावर उद्या सोमवारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
Asha Bhosle Death Live Update: आशा भोसलेंनी घेतला अखेरचा श्वास
Asha Bhosle Death Live Update: आशा भोसलेंनी यांनी ब्रीच कँडी हॉस्पीटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांचे वय 92 वर्ष होते.