संकेत कुलकर्णी, पंढरपूर:
Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीच्या अनुपम्य सोहळ्याला सुरुवात झाली आहे. पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकरी भक्तांच्या भक्तांचा महापूर दिसून येतो आहे. प्रत्येक भाविक हा मुखी विठ्ठलाचे नाव घेत चंद्रभागेच्या तीरावरवरून एकादशीच्या अनुपम्य सोहळ्यात सहभागी होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटेच शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी विठुरायाने महारष्ट्र चालवण्याची शक्ती द्यावी, असं साकडे घातले.
आषाढी एकादशीची शासकीय महापूजा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी नाशिक जिल्ह्यातील कैलास उगले आणि कल्पना उगले यांना मानाचे वारकरी म्हणून पूजेचा बहुमान मिळाला. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेही उपस्थित होते. विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या कल्याणसाठीचा संकल्प केला.
तर महाराष्ट्राची काळजी घेण्याची शक्ती द्यावी सन्मार्गाने चालण्याची सद्बुद्धी द्यावी आणि बळीराजाला आनंदाचे क्षण द्यावेत. असे साकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विठ्ठलाकडे घातले. एकादशीसाठी पंढरपुरात सुमारे 18 लाख भाविकांची मांदियाळी आहे. याच पंधरा लाख भाविकांच्या उपस्थितीत शासकीय महापूजेनंतर एकादशीच्या अनुपम्य सोहळ्याला सुरुवात झाली.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
"यंदा वारीत मोठी गर्दी झाली आहे. वारीत तरुणांची संख्या मोठी वाढली आहे. शासनाने वारीत चांगल्या सुविधा दिल्या आहेत. महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने जात आहे यामध्ये आध्यात्मिक प्रगती महत्वाची आहे. पांडुरंगाला एकच मागणे आहे की सर्व संकट दूर करण्याची शक्ती द्यावी," असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
दरम्यान, ज्याला ज्याला दुर्बुद्धी सुचली त्याच काय झालं हे सर्वांनी पाहिलं आहे. विरोधकांनी सद्मार्गाने चालावे. वारीत कुणालाही येण्याची परवानगी आहे, पण येताना देवाच्या भक्तीने इथे या. आपला अजेंडा चालवण्यासाठी कोणी येत असेल तर चालणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिला.