संकेत कुलकर्णी, पंढरपूर:
Ashadhi Ekadashi 2026 Pandharpur: विठ्ठल नामाचा गजर आणि भक्तीच्या रंगात अवघी पंढरी आज दुमदुमून गेली आहे. आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपुरात भक्तीचा महासागर उसळला असून चंद्रभागेच्या तिरी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत विठ्ठल- रखुमाईची शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या अन्नदात्या बळीराजाच्या सुख, समृद्धी आणि संकटमुक्त जीवनासाठी विठ्ठल चरणी साकडे घातले.
Happy Ashadhi Ekadashi 2026 Wishes: विठू माऊली तू, माऊली जगाची! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
आषाढी एकादशीनिमित्त CM देवेंद्र फडणवीसांकडून शासकीय महापूजा!
आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मानाचे वारकरी व माने दांपत्य यांच्यासोबत आज पंढरपुरात केली. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची संपूर्णपणे शोडशोपचारासह महापूजा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेस खास डिझायनर पोशाख देखील अर्पण केला होता.
नव्या भक्त निवासाचे भूमीपुजन!
पंढरपुरातील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पादुका मंदिराच्या नव्या भक्त निवासाचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. विठ्ठलाची शासकीय पूजा झाल्यानंतर आळंदी देवस्थानच्या वतीने पंढरपुरात नवीन भक्तनिवास उभा केले जात आहे. याचाच भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यामुळे आता पंढरपुरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका मंदिरा सोबतच नवे भक्तनिवास लवकरच उभारले जाणार आहे.
(नक्की वाचा: Devshayani Ekadashi 2026: देवशयनी एकादशीला भगवान विष्णूंची पूजा कशी करावी? काय करावे आणि काय टाळावे? वाचा नियम