2 months ago

Maharashtra Live Blog Updates:  पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती हा या मुद्यावरुन सध्या चांगलंच राजकारण तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या विषयावर सातत्यानं आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांनी या विषयावर) मुंबईमध्ये मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. 5 जुलै रोजी मुंबईत हा मोर्चा निघणार आहे. हिंदी भाषेच्या या विषयावरुन उद्धव ठाकरेंनीही आक्रमक भूमिका घेतली असून आता या मोर्चाच्या निमित्ताने दोन्ही ठाकरेंचे मनोमिलन होणार का? हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

Jun 27, 2025 21:08 (IST)

Live Update : पोहण्यासाठी गेलेल्या 3 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघरच्या बोईसर जवळील गणेश नगर काटकर पाडा येथे तीन अल्पवयीन मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे . मृतांमध्ये दोघे सख्खे भावंडांचा समावेश आहे.  पोहण्यासाठी गेलेल्या चौघांपैकी तिघांचा खड्ड्यातील पाण्यात पाण्यात बुडवून मृत्यू  झाला असून,  एकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे .या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्तांमधे धीरज यादव 11, त्याचा भाऊ सुरज यादव 7 आणि अंकित गुप्ता अशी नावं आहेत.

Jun 27, 2025 17:54 (IST)

Live Update : राज ठाकरेंचा महायुतीच्या नेत्याला फोन, मोर्च्यात सहभागी होण्याचं आवाहन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना थेट फोन करून मराठी भाषेच्या मुद्द्यावर होणाऱ्या मोर्चाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. दोघांमध्ये सुमारे सहा मिनिटांची चर्चा झाली, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. मात्र, या चर्चेनंतरही सदाभाऊ खोत यांनी मोर्चाला पाठिंबा न देण्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्यांच्या संघटनेची स्वतंत्र भूमिका असून कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निर्णय घेण्यात येत असल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाकरे आणि खोत यांच्यातील ही चर्चा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.

Jun 27, 2025 17:09 (IST)

Live Update : हिंदी सक्तीविरोधात उद्धव ठाकरे आक्रमक, कार्यकर्त्यांना दिले आदेश

हिंदी सक्तीविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण ताकदीने आंदोलन करा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकारी आणि नेत्यांना दिलेत. पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, सर्व जिल्हाप्रमुख, मुंबई विभाग प्रमुख, महिला व युवा सेना पदाधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फ्ररन्सद्वारे एक बैठक घेतली. यामध्ये त्यांनी हे आदेश दिलेत. 'मातृभाषेचा अपमान सहन करणार नाही, कोणत्याही भाषेला विरोध नाही, पण सक्तीला मात्र विरोध आहे, असं उद्धव ठाकरेंनी या बैठकीत सांगितलंय.तसंच रविवार दिनांक 29 जून रोजी दुपारी 3 वाजता राज्यात सर्वत्र हिंदी सक्तीच्या GR ची होळी करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत.महाराष्ट्र धर्मासाठी सर्वांनी अहंकार बाजूला ठेवून एकत्र यायला हवं. तुम्हीही स्थानिक पातळीवर सर्वांना सोबत घेऊन काम करा, अशा सूचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्यात.

Jun 27, 2025 12:49 (IST)

Washim News: जिल्हा परिषद शाळेच्या स्लॅब कोसळला, एक विद्यार्थी गंभीर जखमी

जिल्हा परिषद शाळेच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले, एक विद्यार्थी गंभीर जखमी.

वर्गात शिकवणी सुरू असताना कोसळला स्लॅब चा भाग

स्लॅब कोसळल्याने विद्यार्थी भयभीत.

वाशिम जिल्ह्यातील भटउमरा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली घटना

डोक्यात स्लॅब पडल्याने  जखमी  झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी दवाखान्यात नेले

दहावर्षापूर्वी बांधण्यात आली होती इमारत.

Advertisement
Jun 27, 2025 10:44 (IST)

LIVE Updates: नाशिकमध्ये ठाकरेंनाआणखी एक धक्का बसणार, विलास शिंदेही पक्षाला रामराम ठोकणार

- नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसणार

- महानगरप्रमुख विलास शिंदे लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश

- विलास शिंदेंसह काही माजी नगरसेवक, पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती

- काल समर्थकांसोबत मिसळ पार्टीचे आयोजन करत विलास शिंदेंनी प्रवेश निश्चित केल्याची माहिती 

- विलास शिंदे आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक गेल्या काही दिवसांपासून होती चर्चेत, विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यालाही एकनाथ शिंदे यांनी लावली होती हजेरी

Jun 27, 2025 08:35 (IST)

Solapur News: सोलापूर शहर पोलिसांची रेशनच्या तांदळावर मोठी कारवाई

- सोलापूर शहर पोलिसांची रेशनच्या तांदळावर मोठी कारवाई  

- पोलिसांकडून अवैधरित्या वाहतूक होणारा 4 लाख 60 हजार रुपये किंमतीचे 230 पोते रेशनचे तांदूळ जप्त 

- सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना मिळालेल्या माहितीनुसार  करण्यात आली विशेष कारवाई 

- मालट्रक आणि आयशर सह 12 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 

- सरकारी तांदूळ खाजगी बाजारात जात असताना पोलिसांची धडक कारवाई 

- सदर घटने संदर्भात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे

Advertisement
Jun 27, 2025 07:54 (IST)

LIVE Updates: आषाढी एकादशी निमित्त 83 आषाढी विशेष रेल्वे गाड्या धावणार

आषाढी एकादशी निमित्त 83 आषाढी विशेष रेल्वे गाड्या धावणार

मध्य रेल्वे कडून आषाढी एकादशीचे औचित्य साधून दरवर्षी अतिरिक्त गाड्या सोडल्या जातात

 अनेक भाविक रेल्वेने पंढरपूरला जातात 

तर काही भाविक पालखी सोहळा ज्या ठिकाणी पोहोचला आहे तिथून वारी दाखल होतात 

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर मध्ये जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर या तीन एकेरी अतिरिक्त आषाढी रेल्वे सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे

Jun 27, 2025 07:54 (IST)

LIVE Updates: झिशान सिद्दिकींचा पाठलाग अन् रेकी, दोघांना अटक

चार दिवसांपासून हे दोन अनोखी व्यक्ती झिशान सिद्दिकी यांची करत होते रेकी

झिशान सिद्दिकी आज दिवसभर चार चाकी वाहनाने करत होते पाठलाग

बांद्रा निर्मल पोलीस ठाण्यात दोघांची चौकशी सुरू

या दोघांनी आधी अभिनेता सलमान खान यांच्या घराची रेकी केल्याची देखील सूत्रांची माहिती

कार्यकर्त्यांना संशय आल्यानंतर या दोघांना ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली

खेरवाडी या परिसरात झिशान सिद्दिकी यांचं ऑफिस आहे आणि या ऑफिसच्या आवारातच या दोघांना कार्यकर्त्यांनी ताब्यात घेत पोलिसांच्या दिलं ताब्यात

सध्या  संशय असलेली गाडी पोलिसांनी केली जप्त

Advertisement
Jun 27, 2025 07:53 (IST)

Pune News: भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये अबू आजमी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये अबू आजमी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

आमदार अबू आजमी यांनी केलं होतं वारी संदर्भात वक्तव्य 

या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याने पुण्यातील भारतीय विद्यापीठ मध्ये करण्यात आला गुन्हा दाखल 

संघर्ष सेनेचे संतोष साठे यांनी दिली फिर्याद

अबू आजमी यांच्याविरुद्ध BNS 299 व 302 अंतर्गत करण्यात आला गुन्हा दाखल

Jun 27, 2025 07:23 (IST)

LIVE Updates: बोगस शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती घोटाळा: आणखी तिघांना अटक

बोगस शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती घोटाळ्यात नागपूर पोलिसांच्या एस आय टी कडून 

भंडारा जिल्ह्यातील आणखी तिघांना अटक

44 वर्षीय चेतक डोंगरे, 

45 वर्षीय सदानंद जांगडे आणि

63 वर्षीय गंगाधर डोंगरे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

आरोपी चेतक हा पवनी तालुक्यातील गोसे बुज येथील विनोद एज्युकेशन सोसायटी चा प्रभारी सचिव आणि विनोद हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज चा मुख्याध्यापक आहे. त्याने अन्य दोघं आरोपींसोबत मिळून घोटाळा केला.

चेतक डोंगरे याची आई 75 वर्षीय पर्वताबाई ही या संस्थेची अध्यक्षा असून वयोमानामुळे त्या पोलिसांसमोर उपस्थित राहू शकल्या नाहीत.

Jun 27, 2025 07:00 (IST)

Jalgaon Crime: जळगाव बस स्थानकावर खिसे कापणाऱ्या टोळीला अटक

जळगाव बस स्थानकावर प्रवाशांचे खिसे कापून चोरी करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून अटक करण्यात आलेली टोळी ही अमरावती येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अहमद बेग, हाफिज शाह व अझर हुसेन असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे असून त्यांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या चोरट्यांकडून 33 हजार रुपयांची रोख रक्कम 5 मोबाईल व एक कार असा साडेपाच लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे

Jun 27, 2025 06:58 (IST)

LIVE Updates: अडाण धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

अडाण धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाचे २ द्वार १० सेंमीने उघडून सांडव्यावरून पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. अडाण नदीकाठावरील गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Jun 27, 2025 06:57 (IST)

Nashik News: सप्तशृंगी गडावरील भोवरी धबधबा प्रवाहित, पर्यटकांची गर्दी

 उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या नाशिकच्या सप्तशृंग गडाकडे जाणाऱ्या घाट रस्त्याच्या पायथ्याशी असलेला भोवरी धबधबा  प्रवाहित झाला असून, भाविक व पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.पावसामुळे सप्तशृंगी घाट व डोंगर परिसरात सर्वत्र हिरवळ पसरली आहे.घाटातील छोटे मोठे धबधबे प्रवाहित झाले आहे.निसर्गाचा हा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक व भाविकांचे सप्तशृंग गडाकडे वळू लागले आहे.

Jun 27, 2025 06:56 (IST)

LIVE Updates:हुल्लडबाजी करणाऱ्या तीन युवकांना तलवारीसह अटक,

कार उभी करून हुल्लडबाजी करणाऱ्या तीन युवकांना पोलिसांनी धारदार तलवारीसह बल्लारपूर शहरातील पेपर मिल गेट परिसरातून अटक केली. चंद्रभूषण चव्हाण, रवी दोडके व योगेश कुडकेलवार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. काही युवक दंगामस्ती करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पथक घटनास्थळी दाखल झाले असता पेपर मिल तीन एका गेटजवळ कार उभी करून हुल्लड बाजी करीत होते. हुल्लडबाजी करीत होते. पोलिसांनी विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता कारमध्ये तलवार आढळून आली. पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.