जाहिरात

Ashok Kharat: सुखी संसारासाठी पती-पत्नी खरातकडे गेले, त्याने जे केलं... अशोक खरातचा नवा क्रुर कारनामा उघड

अशोक खरात याने पतीला बाहेर थांबण्यास सांगून मन आणि शरीरशुद्धी करण्याचा बहाणा करत महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. 

Ashok Kharat: सुखी संसारासाठी पती-पत्नी खरातकडे गेले, त्याने जे केलं... अशोक खरातचा नवा क्रुर कारनामा उघड

Ashok Kharat Case:  अशोक खरात प्रकरणात प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. अशोक खरात प्रकरणात नवनवे खुलासे होत असून या अत्याचारी बाबाच्या क्रुर कृत्यांची यादी वाढतच चालली आहे. आता या भोंदुबाबा खरातविरोधात आणखी दोन गुन्हे दाखल झाले असून त्याने ३८ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. तसेच एका व्यापाऱ्याचीही फसवणूक केल्याचं उघड झाले आहे.

अशोक खरातचा आणखी एक काळा कारनामा!

भोंदू अशोक खरातविरोधात आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशोक खरात याने  ३८ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याचं उघड झाले आहे. पिडीत महिलेचे कौटुंबिक वाद होते. आपला संसार सुरळीत चालावा म्हणून तिचा पती तिला खरातकडे घेऊन गेला होता. त्यावेळी अशोक खरातने नवरा बायकोत भांडण होऊ नये म्हणून शुद्धी करावी लागेल असं सांगितले. यावेळी अशोक खरात याने पतीला बाहेर थांबण्यास सांगून मन आणि शरीरशुद्धी करण्याचा बहाणा करत महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. 

IAS Transferred: राज्यात बदल्यांचा धडाका! 8 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात मोठे बदल

 दुसऱ्या गुन्ह्यात अशोक खरात याने एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.  नेवासा येथील व्यावसायिक राजेंद्र भागवत यांनी व्यवसायात वृद्धी होण्याकरीता अशोक खरातची भेट घेतली होती. यावेळी खरात याने अंगठीमध्ये चिंचोका घालून देत २ लाख ६२ हजारांची फसवणूक केली. खरात विरोधात हा ११ वा गुन्हा दाखल झाला आहे 

रुपाली चाकणकरांचा राजीनामा!

दरम्यान, अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना दुसरा धक्का बसला आहे.  रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे वाढलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.  पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना एकाच ओळीत राजीनामा पाठवत, तोच ट्विटवर पोस्ट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Central Government on Lockdown: देशात लॉकडाऊनच्या चर्चांदरम्यान केंद्राचं स्पष्टीकरण; सद्यस्थिती काय?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com