Ashok Kharat Case Rupali Chakankar VIDEO: नाशिकचा अत्याचारी भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कॅप्टन खरात प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. रुपाली चाकणकर स्वत: तंत्रमंत्र करतात असा दावा करत त्यांनी अमावस्येला अनामिका कापून घेतात, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता. याचे फोटोही अंधारे यांनी दाखवले होते. या आरोपांवर आत्तापर्यंत मौन बाळगलेल्या रुपाली चाकणकर यांनी पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे.
Pune News: वसंत मोरेंना झटका! कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता; कारण काय?
काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?
"गेली वीस बावीस वर्ष सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करताना ,जसजसा प्रगतीचा आलेख वाढत गेला तशतशी चिखलफेक करणारी विकृती वाढत गेली. प्रत्येक वेळी संयमाने शांतपणाने टिका सहन केली,वैयक्तिक टिका करणे हे माझ्या रक्ताताच नाही. पण आता सगळ्या मर्यादा ओलांडून माझ्यासह कुटुंबाला जो त्रास दिला जातोय ते भयावह आहे. ज्यांनी हा आयुष्याचा प्रवास जवळून पाहिलाय ते सर्व संपर्क करून “आम्ही सोबत आहोत “हे आवर्जून सांगतात. त्या सर्वांचे आभार. खरात प्रकरणात मी पहिल्या दिवशीच भूमिका स्पष्ट केली आहे, तपास निष्पक्षपणे व्हावा यासाठी आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व त्यानंतरही माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुराव्यासह स्पष्टीकरण दिले आहे" असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
तसेच या पोस्टसोबत रुपाली चाकणकर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी सुषमा अंधारे यांचा अनामिका कापल्याचा दावा खोडून काढत गाडीतून उतरताना दरवाजात बोट अडकल्याने ही जखम झाल्याचं यामध्ये म्हटलं आहे. पुण्यातील विघ्नहर्ता मित्र मंडळाचे अध्यक्षांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. आरतीला आलेल्या असताना त्यांच्या बोटाला ही जखम झाली होती, असा दावा या व्हिडिओमध्ये केला आहे.
दरवाजात बोट अडकल्याने जखम..
मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले की, "रुपाली ताई दरवर्षी आमच्या मंडळात आरतीला येतात. ९ सप्टेंबर रोजीही ताई आरतीसाठी आल्या होत्या. गाडीतून उतरताना दरवाजात बोट अडकल्याने त्यांना जखम झाली. रक्त वाहत होते, तशाच स्थितीत त्या बोटाला टिश्यू पेपर लावून आरतीसाठी आल्या. मंडळाच्या पेजवर आजही हा व्हिडिओ उपलब्ध आहे, ज्यामध्ये ताईंच्या बोटाला लागल्याचे दिसत आहे. आत्ता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ध चा म केल्याचे दिसत आहे. कोणतीही शहानिशा न करता खोटे आरोप केले जात आहेत. ताईंबद्दल चुकीचा मेसेज फिरत आहे, आम्ही याचा निषेध करतो
त्याचबरोबर मंडळातील आणखी एका सदस्यानेही याबाबत बाजू मांडली आहे. रुपाली ताईंच्या बोटाला पट्टी बांधली होती. त्यांचा चेहरा पडला होता. त्यांना विचारल्यानंतर बोटाला जखम झाल्याचे सांगितले. मी त्यांना घरी नेले, माझ्या पत्नीने ताईंच्या बोटाला हळद लावली. ताईंचे बोट अडकले, ताई अक्षरश: रडत होत्या, असाही दावा या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे.