Maharashtra Chief Minister : आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?

महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार करताना पहिल्यांदा  या तिघांचा शपथविधी होणार असल्याची माहिती हाती आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकीत घवघवीत यशानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निवडणुकीपूर्वीच महायुतीतून मुख्यमंत्री कोण होणार यावरुन वाद सुरू असल्याचं सांगितलं जात होतं. या जागेवर भाजपसह शिंदे गटाकडून दावा केला जात होता. मात्र विधानसभा निकालानंतर भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी जोर लावला जाण्याची शक्यता अधिक आहे. 

Advertisement

नक्की वाचा - महायुती-मविआमधील कोणत्या पक्षाने किती जागा लढवल्या अन् जिंकल्या? कोणाचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त?

विधानसभा निवडणुकीत भाजपचा 148 जागांपैकी 132 जागांवर, शिंदे गटाचा 85 जागांपैकी 57 जागांवर तर अजित पवार गटाचा 51 जागांपैकी 41 जागांवर विजय झाला आहे. सर्वाधिक आमदार भाजपचे आहेत. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. 

Advertisement

कधी होणार मंत्रिमंडळ विस्तार?
26 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार करताना पहिल्यांदा  या तिघांचा शपथविधी होणार असल्याची माहिती हाती आली आहे. सध्या क्रिकेट मॅचेसमुळे वानखडे स्टेडिअमवर शपथविधी करणं शक्य नसून दुसरीकडे शिवाजी पार्कात 6 डिसेंबरची तयारी सुरू आहे. त्यामुळे पहिल्या पातळीवर तिघांचा शपथविधी पार पडू शकतो. 

Advertisement

दुसरीकडे महायुतीचा मंत्रिमंडळ मोठा विस्तार करण्याऐवजी आधी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी शपथ घ्यावी. नंतर नागपूर अधिवेशन आधी विस्तार मोठा करावा असा एक मत प्रवाह आहे. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह  प्रत्येक पक्षाचे काही मंत्री घेत मंत्री मंडळ विस्तार करावा, असंही काही नेत्यांचं म्हणणं आहे. शपधविधी सोहळा आणि मंत्रिमंडळ विस्तार यात नेमक काय करायचे याचा निर्णय भाजपाचे नेते अमित शाह यांच्या समवेत बैठकीत होणार आहे. 

नक्की वाचा - ट्रम्पेट चिन्हाने पुन्हा दिला धोका, शरद पवार गटाच्या राहुल मोटे यांचं विजयाचं गणित फिस्कटलं

भाजपा सीएम पदावर दावा करण्याच्या हालचाली - सूत्र 
अमित शाह यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत याबाबत  चर्चा होण्याची शक्यता आहे. आज रात्री याबाबत घडामोडी घडण्याची शक्यता आहे. भाजपा सर्व आमदार उद्या मुंबईत बोलवण्याची शक्यता आहे. उद्या विधीमंडळ भाजपचा नेता निवड करून, महायुती सत्तास्थापनाचं पत्र राज्यपालांना देण्याची शक्यता आहे. महायुतीचे नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार रात्री दिल्लीला भाजपा पक्ष श्रेष्ठी समवेत बैठक करून सत्तास्थापन आणि मंत्री मंडळ विस्तार याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे.